Eknath Shinde : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मधील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाला ५० कोटी देण्याचा निर्णय

प्रत्यक्ष स्मारकाच्या कामाला गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश


मुंबई : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ५० कोटी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज घेतला आहे. या निधीमुळे जिजाऊंच्या स्मारकाचा कामाला तत्काळ गती देता येणे शक्य होणार आहे.


सिंदखेडराजामधील या स्मारक आणि जिजाऊसृष्टीच्या कामासाठी २०२४ साली ५० कोटी जाहीर करण्यात आले होते. या निधीमधून सिंदखेडराजा जवळील जिजाऊसृष्टीचे काम सुरू करण्यात आले होते. आजवर या कामांसाठी २७ कोटींचा निधी खर्च झाला असून हे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र शहरातील लखुजी जाधव यांच्या ऐतिहासिक वाड्यातील प्रत्यक्ष स्मारकाच्या कामालाही सुरुवात करता यावी यासाठी अजून ५० कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



या निधीतून जिजाऊ माँसाहेबांच्या स्मारक तसेच या परिसरातील रस्ते आणि आजूबाजूच्या इतर सोयी सुविधांचा विकास केला जाईल. स्थानिक नगरपालिकेकडून प्रस्ताव मागवून पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून या कामाला गती देण्यात येणार असून, लवकरात लवकर या स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार रोहित पवार, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार सुनील भुसारा, माजी आमदार शशिकांत खेडेकर हेदेखील यावेळी उपस्थित होते.


Comments
Add Comment

Maharashtra Anti-Conversion Act : 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य' कायद्याची रक्षाबंधनापासून अंमलबजावणी

- महायुती सरकारची लाडक्या बहिणींना विशेष भेट; १० वर्षांपर्यंत कारावास, ७ लाखांचा दंड, धर्मांतराच्या उद्देशाने

Beed Crime : सीझर झालं, गोंडस बाळाचा जन्मही झाला पण... आईच्या पोटात अशी काही वस्तू राहिली की सगळ्यांनाच धक्का बसला

Beed : बीड जिल्हा रुग्णालयात घडलेला एक प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे. बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय

Anand Bansode : आनंद बनसोडे यांची ऑस्ट्रेलियाच्या माऊंट कोसिअस्कोवर तिसऱ्यांदा यशस्वी चढाई

पुणे : ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर माऊंट कोसिअस्कोवर ३६० एक्स्पलोररचे संस्थापक एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे

Prakash Abitkar : सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित, उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणार - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

सर्पदंशाची प्रत्येक घटना, विषप्रतिबंधक लसीचा साठा, केलेले उपचार व मृत्यूची माहिती होणार नोंदबद्ध मुंबई :

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील शिरोडा येथे ताज हॉटेलसाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी, मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे महत्त्वाकांक्षी ताज प्रकल्पाला गती

महत्वाच्या हॉस्पिटॅलिटी प्रकल्पामुळे सिंधुदुर्गातील पर्यटन, रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना

Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील वर्षीच?

- 'एसआयआर' प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कार्यवाही नको; केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका मुंबई : राज्यातील