Beed Crime : सीझर झालं, गोंडस बाळाचा जन्मही झाला पण... आईच्या पोटात अशी काही वस्तू राहिली की सगळ्यांनाच धक्का बसला

Beed : बीड जिल्हा रुग्णालयात घडलेला एक प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे. बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपानुसार,19 वर्षीय संध्या सूरज गायकवाड यांच्यावर 1 ऑगस्ट रोजी सीझर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांनी त्यांना तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर पुण्यातील ससून रुग्णालयात करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्या पोटातून वैद्यकीय हातमोजे आणि कागदी रुमाल बाहेर काढण्यात आल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. सध्या संध्या यांची प्रकृती चिंताजनक आहे.



नेमकं प्रकरण काय ?


संध्या गायकवाड यांना बाळंतपणासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 1 ऑगस्ट रोजी त्यांच्यावर सीझर शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर प्रकृती स्थिर असल्याचे सांगत चार दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र घरी गेल्यानंतर काही दिवसांतच संध्या यांना तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. वेदना वाढत असल्याने कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणी आणि सोनोग्राफी केल्यानंतर त्यांच्या पोटात काहीतरी अनोळखी वस्तू असल्याचे निदर्शनास आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.



संध्या यांची प्रकृती चिंताजनक


संध्या यांची प्रकृती वेगाने खालावत असल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात हलवले. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेदरम्यान संध्या यांच्या पोटातून वैद्यकीय हातमोजे (Medical Gloves) आणि कागदी रुमाल (Paper Napkins) बाहेर काढण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या या अक्षम्य निष्काळजीपणामुळे संध्या यांच्या पोटात गंभीर संसर्ग झाला असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.



डॉक्टर, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस


या घटनेमुळे संपूर्ण गायकवाड कुटुंब पुरते कोलमडले असून कुटुंबीयांमध्ये संतापाचे वातावरण आहे. बाळाच्या जन्मानंतर काही दिवसांतच संध्या यांची प्रकृती गंभीर झाल्याने कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे. संबंधित डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची बीड जिल्हा शल्यचिकित्सकांनी गंभीर दखल घेतली आहे. संबंधित महिला डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समिती गठीत करण्यात आली आहे.चौकशी अहवालात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे स्पष्टीकरण आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Anti-Conversion Act : 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य' कायद्याची रक्षाबंधनापासून अंमलबजावणी

- महायुती सरकारची लाडक्या बहिणींना विशेष भेट; १० वर्षांपर्यंत कारावास, ७ लाखांचा दंड, धर्मांतराच्या उद्देशाने

Eknath Shinde : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मधील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाला ५० कोटी देण्याचा निर्णय

प्रत्यक्ष स्मारकाच्या कामाला गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई : बुलडाणा

Anand Bansode : आनंद बनसोडे यांची ऑस्ट्रेलियाच्या माऊंट कोसिअस्कोवर तिसऱ्यांदा यशस्वी चढाई

पुणे : ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर माऊंट कोसिअस्कोवर ३६० एक्स्पलोररचे संस्थापक एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे

Prakash Abitkar : सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित, उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणार - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

सर्पदंशाची प्रत्येक घटना, विषप्रतिबंधक लसीचा साठा, केलेले उपचार व मृत्यूची माहिती होणार नोंदबद्ध मुंबई :

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील शिरोडा येथे ताज हॉटेलसाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी, मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे महत्त्वाकांक्षी ताज प्रकल्पाला गती

महत्वाच्या हॉस्पिटॅलिटी प्रकल्पामुळे सिंधुदुर्गातील पर्यटन, रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना

Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील वर्षीच?

- 'एसआयआर' प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कार्यवाही नको; केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका मुंबई : राज्यातील