Anand Bansode : आनंद बनसोडे यांची ऑस्ट्रेलियाच्या माऊंट कोसिअस्कोवर तिसऱ्यांदा यशस्वी चढाई

पुणे : ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर माऊंट कोसिअस्कोवर ३६० एक्स्पलोररचे संस्थापक एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्यासोबत इतर ३ गिर्यारोहकांनी यशस्वी चढाई करत भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे. १५ ऑगस्ट २०१६ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ८ वाजता यशस्वी चढाई पूर्ण केली व भारताचा तिरंगा फडकवला. (Anand Bansode)


पुण्यातील स्मिता घुगे, सांगलीचा तुषार सुभेदार व म्हैसूर येथील प्रीत हे या मोहिमेत सहभागी होते. स्मिता ने सर्वात मोठा तिरंगा फडकवात विक्रम प्रस्थापित केला. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे याने २०१४, २०२३ आणि आता २०२६ या वर्षात हे शिखर सर करून तिसऱ्या वेळेस हे शिखर सर करण्याचा मान मिळवला. याशिवाय आतापर्यंत आफ्रिकेतील सर्वोच्च माउंट किलिमांजारो, युरोपातील सर्वोच्च माउंट एलब्रूस व आता ऑस्ट्रेलिया मधील कोझीयस्को ही सर्व शिखरे ३ वेळा चढाई करून गिर्यारोहन क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे.



गेले काही दिवस कोसिअस्को शिखरावर खूप जास्त प्रमाणात बर्फ पडला असून त्यामुळे चढाईवर खराब वातावरणाचे संकट होते. तरीही १५ ऑगस्ट रोजी भारतीय तिरंगा हातात घेत माऊंट कोसिअस्कोच्या शिखरावर पोहोचून आनंद बनसोडे व टीमने यांनी देशाच्या स्वातंत्र्यदिनाला अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. (Anand Bansode)


माऊंट कोसिअस्को ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च पर्वत आहे. जगातील सात खंडांतील सर्वोच्च शिखरांवर चढाई करण्याच्या साहसी प्रवासात कोसिअस्कोला विशेष महत्त्व आहे. एव्हरेस्ट सर करणारे आनंद बनसोडे यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली ३६० एक्स्पलोरर जगभरातील साहसी आणि परिवर्तनात्मक प्रवासाचे आयोजन करते.


“एके काळी स्वतः ही सर्व शिखरे सर करत होतो. आता इतरांना घेऊन ही शिखरे सर करताना विशेष आनंद होत आहे. भारताचा तिरंगा जगातील सर्वोच्च आणि महत्त्वाच्या शिखरांवर अभिमानाने फडकवणे ही माझ्यासाठी केवळ गिर्यारोहणाची कामगिरी नाही, तर भारताला दिलेली एक मानवंदना आहे.” - आनंद बनसोडे (Anand Bansode)

Comments
Add Comment

Beed Crime : सीझर झालं, गोंडस बाळाचा जन्मही झाला पण... आईच्या पोटात अशी काही वस्तू राहिली की सगळ्यांनाच धक्का बसला

Beed : बीड जिल्हा रुग्णालयात घडलेला एक प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे. बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय

Eknath Shinde : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मधील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाला ५० कोटी देण्याचा निर्णय

प्रत्यक्ष स्मारकाच्या कामाला गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई : बुलडाणा

Prakash Abitkar : सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित, उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणार - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

सर्पदंशाची प्रत्येक घटना, विषप्रतिबंधक लसीचा साठा, केलेले उपचार व मृत्यूची माहिती होणार नोंदबद्ध मुंबई :

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील शिरोडा येथे ताज हॉटेलसाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी, मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे महत्त्वाकांक्षी ताज प्रकल्पाला गती

महत्वाच्या हॉस्पिटॅलिटी प्रकल्पामुळे सिंधुदुर्गातील पर्यटन, रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना

Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील वर्षीच?

- 'एसआयआर' प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कार्यवाही नको; केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका मुंबई : राज्यातील

Manoj Jarange : मनोज जरांगेंकडून २९ ऑगस्टला आझाद मैदानात आंदोलनासाठी पत्र

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून पुन्हा आंदोलनाची हाक दिली असून, त्यासाठी मुंबईतील