- कायाकल्प प्रकल्पाला महापालिका सभागृहात रात्री साडेबारा वाजता मंजुरी
मुंबई (सचिन धानजी)
बेस्टचा (Best Bus) उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून बेस्टचा कार्यापालट करण्यासाठी कायाकल्प प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्ट उपक्रमाला उभारी देवून भविष्यात कुणासमोरही हाती कटोरा घेवून फिरण्याची गरज निर्माण होणार नाही आणि बेस्टला स्वावलंबी बनवण्याचा दृष्टीकोनातून हा कायाकल्प प्रकल्पाला महापालिकेची तत्वत: मान्यता देण्यासाठी सभागृहात हा प्रस्ताव ठेवला होता. तब्बल तीन तास चाललेल्या चर्चेनंतर रात्री साडेबारा वाजता या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. (BMC News)
बेस्ट (Best Bus) उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या कायाकल्प प्रकल्पाला तत्वत: मंजुरीसाठीचा प्रस्ताव तातडीचे कामकाज म्हणून मंगळवारी महापालिका सभागृहात विशेष बैठकीत पटलावरण ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजुरीला आला असता उबाठाचे शैलेश फणसे यांनी बेस्टचे २२ आगार देण्याचा प्रस्ताव असल्याने हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची उपसूचना मांडत त्यांनी याला प्रस्तावाला विरोध दर्शवला. यातून बेस्ट कायाकल्प प्रकल्पातून २८ हजार कोटींचा महसूल अपेक्षित असून जे प्रकल्प हाती घेतले आहे त्यासाठी १४ हजार३२२ कोटी रुपये आणि ५ हजार बसेससाठी १३ हजार कोटी रुपये हवे आहेत. त्यामुळे यासाठी आगारांच्या जागा विकण्याऐवजी बेस्टने कर्ज उभारुन त्यातून याचा विकास करावा अशी सूचना करत या २२ आगारांच्या जागा हातच्या जाणार असल्याने यातना होणार असल्याचे सांगितले. यावर काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी उपसूचनेला अनुमोदन देत २००७ पासून बेस्ट उपक्रम तोट्यात असल्याचे सांगत ४ हजार कोटींचे तुटीत असताना वेटलिजवरील बसेस घेतल्या तरीही बेस्ट नफ्यात का आली नाही असा सवाल केला. (BMC News)
नवी दिल्ली : परीक्षा नियोजनातील पारदर्शकतेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएने ६०० तज्ज्ञांना हटवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या तज्ज्ञांच्या ...
बेस्ट आगारांचा विकास महापालिकेने करावा
उबाठाचे सचिन पडवळ यांनी बेस्ट आगारांचा (Best Bus) सी अँड डी तत्वावर बीडीडी चाळीच्या तत्वावर विकास करून त्यांच्या एफएसआय विकून पैसे उभारले जावेत अशी सूचना केली. तसेच बेस्ट उपक्रम महापालिकेत विलीन करून या बेस्ट आगारांचा विकास महापालिकेने करावा अशीही सूचना केली. तर उबाठाचे सचिन पाटील यांनी शेती राखायची असते, शेती विकायची नसते असे उदाहरण देत बेस्टच्या आगारांची जागा विकू देवू नका असे सांगितले. (BMC News)
रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा अणि टँक्सीचे शेअर स्टॉप कुणी दिले :
भाजपचे प्रविण छेडा यांनी बेस्टची (Best Bus) ही परिस्थिती का आली असे सांगत रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा अणि टँक्सीचे शेअर स्टॉप कुणी दिले असा सवाल केला. पूर्वी ४५ लाख प्रवाशी होते आणि आता २२ लाख प्रवाशी आहेत असे सांगत कामगारांचे वेतन, त्यांची ग्रॅज्युएटीची रक्कम कुठून आणणार असा सवाल करत उबाठाच्या नगरसेवकांचा समाचार घेतला. बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी हे भूखंड विकत नसून ४९ वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्यात येत आहे, बेस्ट समितीत या प्रस्तावाला कुणीही विरोध केला नाही,असे सांगितले. (BMC News)
महापौरांना का विचारता, आपल्या शेजारी बसलेल्या विरोधी पक्षनेत्यांना विचारा :
भाजपचे प्रवेक्त व नगरसेवक नवनाथ बन यांनी आगारांच्या जमिनी विकल्या जाणार नसून आता या जमिनीची पेरणीही करू आणि जमिनही राखू असे सांगितले. तर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सन २०१८मध्ये बेस्ट ४ हजार कोटी रुपये तुटीत होती, म्हणून वेट लिजवर बसेस घेतल्या, मग बेस्ट फायद्यात का आली नाही, हा प्रश्न अश्रफ आझमी महापौरांना का विचारता, आपल्या शेजारी बसलेल्या विरोधी पक्षनेत्यांना विचारा ना असे सांगत काँग्रेसवाले सोयीचे राजकारण करत आहेत. या वेटलिजचा प्रस्ताव कुणी मंजूर केला? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता याच्या खोलात मी जाणार नाही, पण राजकारणाला राजकारण करत बसलो तरी बेस्ट कधीही नफ्यात येणार नाही. त्यामुळे बेस्टला पुन्हा एकदा सावरुन उभे राहण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून निर्णय घेण्याची वेळ आहे असे आवाहन त्यांनी केले. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी उपसूचनेला पाठिंबा देत मूळ प्रस्तावाला विरोध जाहीर केला. (BMC News)
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सोनेरी दिवस मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्याला जागतिक पर्यटन नकाशावर आणण्यासह स्थानिक पातळीवर रोजगाराच्या अफाट संधी निर्माण ...
आम्ही चांगल्या योजना व प्रकल्प आणला की यांचा विरोध :
तर सभागृहनेते गणेश खणकर यांनी बेस्टचे (Best Bus) तिकीट पाच रुपये केले होते, तेव्हा ही तुट कुठून भरुन काढणार असा सवाल मी केला होता, पण तेव्हाच्या अध्यक्षांनी मला याचे उत्तर दिले नाही. तर मेट्रोचा प्रस्ताव याच सभागृहात बहुमताने नाकारला होता याचे स्मरण करून देत खणकर यांनी पीपीपी धोरणाची सुरुवात तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या काळात झाली होती,त्यामुळे याला काँग्रेसवाले विरोध करत असले तरी याची सुरुवात त्यांच्याच सरकारने केला होता याचा त्यांना विसर पडला आहे,असे सांगितले. ज्या ज्यावेळेला आम्ही चांगल्या योजना व प्रकल्प आणला की हे विरोध करत असताना, त्यांच्या नकारघंटाची आता आम्हाला सवय झाली असून बेस्टचा नक्कीच कायाकल्प झालेला येत्या पाच वर्षांच्या आत दिसेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. (BMC News)
आगारांचे आधुनिकीकरण झाल्याशिवाय बेस्ट बसेसची खरेदी करता येणार नाही!
बेस्ट (Best Bus) महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी बेस्टला ताफा दहा हजार बसेस असण्याची आवश्यकता असून सध्या केवळ २८०० एवढाच ताफा आहे. तर स्वमालकीचे बसेस या २४९ एवढ्या आहेत. तर बेस्टच्या आगार हे जुने जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या आहेत. त्यांचे आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे. आणि हे आगार भाडेतत्वावर देताना प्रथम आगारांच्या जागेचा विकास करून दिल्या जाणार आहे. या आगारांचे आधुनिकीकरण झाल्याशिवाय बेस्ट बसेसची खरेदी करता येणार नाही. कारण त्यामध्ये चार्जिंग सेंटरसह इतर सुविधा उपलब्ध होतील. एवढेच नाहीतर बेस्ट वसाहतींचा विकास त्यातून करून १० हजार सदनिका बांधून मिळणार आहे. आज केवळ हा प्रस्ताव तत्वत: मान्यता घेवून सरकारकडे पाठवला जाईल. त्यांच्याकडे मंजुर झाल्यानंतर धोरण बनवण्याचा प्रस्ताव पुन्हा आणला जाईल. त्यामुळे आज आपण अंदाजे २८००० कोटी रुपये निश्चित केले असले तरी विस्तृत प्रकल्प अहवाल बनवल्यानंतर यातून अधिक उत्पन्न कसे मिळेल याचा विचार केला जाणार आहे. परंतु भविष्यात यातील कॉर्पस फंडमुळे बेस्टला कधीही कुणाकडे आर्थिक परिस्थितीमुळे हात पसरण्याची गरज भासणार नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर फणसे यांची उपसूचना बहुमताने फेटाळत मूळ प्रस्ताव मंजूर महापौरांनी मतास टाकत मंजूर केला. (BMC News)