Nashik Crime News : नाशिक - मालेगावात ‘सर्च ऑपरेशन’, एक लॅपटॉप आणि चार मोबाईल जप्त

Nashik Crime News : नाशिक शहर व मालेगाव परिसरात आक्षेपार्ह साहित्य ठेवल्याची गुप्त माहिती दहशतवादी विरोधी पथक व गाेपनीय यंत्रणेला प्राप्त झाल्यानंतर नाशिक पोलिस आयुक्तालय व नाशिक ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे मध्यरात्री धडक शोध मोहीम राबवली. न्यायालयाच्या सर्च वॉरंटनुसार राबवलेल्या या कारवाईमुळे नाशिक व मालेगावात (Nashik and Malegaon) खळबळ उडाली आहे. या कारवाईत पोलिसांच्या हाती कोणतीही थेट बंदी असलेली किंवा आक्षेपार्ह गोष्ट आढळलेली नसली तरी, संशयास्पद एक लॅपटॉप, चार मोबाईल आणि कापड उद्योगात वापरली जाणारी रसायने जप्त केली आहेत.



मालेगाव, नाशिक शहरात एकाच वेळी कारवाई


नाशिक शहरातील तीन संशयित व्यक्तींनी मालेगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही ठिकाणी आक्षेपार्ह साहित्य ठेवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यामध्ये मालेगावातील गल्ली क्रमांक ३ येथील पत्र्याच्या शेडमधील कापडाचे गोदाम, तसेच रक्तपेढीजवळील अहले सुन्नत मशीद, मदरसा आणि खानकाह-ए-बरकातिया या ठिकाणांचा उल्लेख होता. माहितीची खातरजमा करण्यासाठी न्यायालयाकडून शोध वॉरंट प्राप्त करण्यात आले. त्यानंतर नाशिक शहर गुन्हे शाखा आणि ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे शोध व पडताळणी मोहीम राबवली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करून मालेगाव आणि नाशिक शहरात एकाच वेळी कारवाई करण्यात आली.



एक लॅपटॉप आणि चार भ्रमणध्वनी जप्त


१३ ऑगस्ट रोजी रात्री अडीच वाजता मालेगावातील संबंधित ठिकाणांसह नाशिक शहरातील संशयितांच्या घरांवर एकाच वेळी झडती घेण्यात आली. कायदेशीर तरतुदींनुसार सखोल तपासणी करण्यात आली. मात्र, या कारवाईत कोणतेही आक्षेपार्ह, प्रतिबंधित किंवा संशयास्पद साहित्य आढळून आले नाही. दरम्यान, एका कापड रंगविण्याच्या ठिकाणी हातमागावरील साडी निर्मितीसाठी वापरले जाणारे कॉस्मेटिक सोडा, नायट्राईड आणि सोडा हे पदार्थ आढळले. या साहित्याबाबत कोणतीही शंका राहू नये, यासाठी त्याची वैज्ञानिक तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मालेगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील यांनी हे साहित्य जप्त करून पुढील तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवले आहे.


याशिवाय नाशिक शहरातील तीन संशयित व्यक्तींची झडती घेतल्यानंतर त्यांच्या ताब्यातून एक लॅपटॉप आणि चार भ्रमणध्वनी जप्त करण्यात आले. या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची न्यायवैद्यक आणि तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे. दोन्ही प्रकरणांचा तपास सध्या सुरू असून, न्यायवैद्यक तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Women Health : महिलांसाठी 'ही' फळं आहेत फायदेशीर; आहारात नक्की करा समावेश आणि अनुभवा बदल

मुंबई : महिलांच्या आरोग्यासाठी संतुलित आहारासोबत फळांचा नियमित आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. फळांमधून

Calcium Rich Foods : दूध आवडत नाही? हाडांसाठी कॅल्शियम असलेले हे 6 पदार्थ आहारात नक्की घ्या

मजबूत हाडे आणि दातांसाठी कॅल्शियम महत्त्वाचे आहे. लहानपणापासून कॅल्शियमसाठी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.

Bhusawal : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग आरपीएफची 'ऑपरेशन नारकोस 'अंतर्गत मोठी कारवाई, १० लाखांचा गांजा जप्त

Bhusawal : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) "ऑपरेशन नारकोस" अंतर्गत भुसावळ रेल्वे स्थानकावर

Technology News : 'I'm Not A Robot' वर क्लिक केल्यानंतर Google ला कसं कळतं की तुम्ही माणूस आहात? जाणून घ्या भन्नाट कारण

इंटरनेट वापरताना अनेक वेबसाइटवर 'I'm Not A Robot' म्हणजेच 'मी रोबोट नाही' या पर्यायावर क्लिक करावा लागतो. अनेकांना वाटते की

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक