Bhusawal : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग आरपीएफची 'ऑपरेशन नारकोस 'अंतर्गत मोठी कारवाई, १० लाखांचा गांजा जप्त

Bhusawal : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) "ऑपरेशन नारकोस" अंतर्गत भुसावळ रेल्वे स्थानकावर अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध धडक कारवाई करत ९ लाख ९७हजार ९५० रुपये किमतीचा १९.९५९ किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. १६ ऑगस्ट २०२६ रोजी ट्रेन क्रमांक १२८६० गीतांजली एक्सप्रेस भुसावळ स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर आली असता, ड्युटीवर तैनात सुरक्षा आरक्षक लोकेश्वर यादव यांना पुढील बाजूकडील दुसऱ्या डब्यातून एक संशयित व्यक्ती खांद्यावर पांढऱ्या प्लास्टिकची गोणी घेऊन उतरताना दिसली.


संशय आल्याने त्याची चौकशी केली असता गोणीमध्ये गांजा असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी संशयितासह ती गोणी आरपीएफ पोस्टवर आणून सहायक सुरक्षा निरीक्षक महिलाल सिंह यांना माहिती दिली. त्यानंतर मंडळ सुरक्षा नियंत्रक, वरिष्ठ अधिकारी, जीआरपी व सीआयबी भुसावळ यांना घटनेची कल्पना देण्यात आली. आरपीएफच्या "वीरू" या शोधक शवानाने तपासणी केली असता गोणीत अंमली पदार्थ असल्याची पुष्टी झाली.



१० लाखांचा गांजा जप्त


वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने आणि नियमानुसार आवश्यक कार्यवाही पूर्ण करून गोणीची झडती घेतली असता, त्यात गांजाची १० बंडले आढळली. ही कारवाई कॉन्स्टेबल कपिल कुमार (सीआयबी), जीआरपी कर्मचारी आणि सहाय्यक सुरक्षा आयुक्त जितेंद्र सिंहा यांच्या उपस्थितीत करण्यात आली. जप्त केलेल्या १९.९५९ किलो गांजाची अंदाजे किंमत ९,९७,९५० रुपये आहे. याप्रकरणी अरुण कुमार उर्फ सोनू लालू प्रसाद (वय २५, रा. चरतीपूर, पोस्ट बारा, जि. कानपूर, उत्तर प्रदेश) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.


पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी व जप्त गांजा जीआरपी भुसावळ यांच्या ताब्यात देण्यात आला असून, १७ ऑगस्ट २०२६ रोजी एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी कटिबद्ध असून, प्रवाशांनी कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित आरपीएफ किंवा जीआरपीशी संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Mangalagaur 2026 : आजपासून मंगळागौरला सुरूवात...जाणून घ्या शुभ मुहूर्त, सोपी पूजा पद्धत अन् पौराणिक कथा!

श्रावणातील पहिल्या मंगळवारी मंगळागौरीचे आगमन श्रावण महिन्याची चाहूल लागताच संपूर्ण महाराष्ट्रात सणांची

Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुरंदर विमानतळापर्यंत थेट बोगदा; मेट्रोसह वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग

पुणे : पुणे (Pune) आणि आसपासच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुरंदर येथे प्रस्तावित छत्रपती

Nitin Gadkari : पुणे ते संभाजीनगर २ तासांत, तर मुंबई-बंगळुरू अवघ्या ५ तासांत! नितीन गडकरींनी मांडला महामार्गांचा 'मास्टर प्लॅन'

पुणे : महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक गतीमान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

History of Ukadiche Modak : गणपती बाप्पा आणि मोदकाचं अतुट नातं! काय आहे उकडीच्या मोदकाचा पौराणिक आणि रंजक इतिहास?

मुंबई : गणेशोत्सव असो वा संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'मोदक' हा अग्रस्थानी असतो. लहानपणापासूनच

Auto Driver Marathi Test : ७ हजार ७५० रिक्षाचालक मराठी परीक्षेत नापास, ३० दिवसांची अंतिम मुदत

मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे परमिट रद्द करणार मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू करण्यात

Bhimashankar Accident : भीमाशंकर महामार्गावर भीषण अपघात; 2 रिक्षांना कारची धडक, 12 जण गंभीर जखमी

पुणे : श्रावण महिना, वीकेंडची सुट्टी आणि सोमवार असल्याने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर