Monday, August 17, 2026

Pune Crime : मित्राला घेऊन काकीच्या खोलीत घुसला अन् थोड्याच वेळात किंचाळण्याचा आवाज; पुण्यात नेमकं काय घडलं?

Pune Crime : मित्राला घेऊन काकीच्या खोलीत घुसला अन् थोड्याच वेळात किंचाळण्याचा आवाज; पुण्यात नेमकं काय घडलं?

पुणे : पुण्यातील एकबोटे कॉलनी परिसरात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यवसायासाठी 1 लाख रुपये देण्यास नकार दिल्याच्या रागातून पुतण्याने आपल्या 66 वर्षीय काकूवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या कानातील सोन्याचे दागिनेही जबरदस्तीने हिसकावण्यात आले. (Pune Crime)

ही घटना 15 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश जुगराज सुराणा (वय 58, रा. गंगाधाम) आणि फरमान मन्सूर पारकर (वय 28, रा. कोंढवा) हे दोघे महिलेच्या घरी गेले होते. दिनेश सुराणा याने व्यवसायासाठी काकूकडे 1 लाख रुपयांची मागणी केली. मात्र, महिलेने पैसे देण्यास नकार दिला. (Attack case)

पैसे देण्यास नकार मिळाल्यानंतर दिनेशने रागाच्या भरात धारदार चाकू काढून महिलेच्या गळ्यावर आणि डाव्या मनगटावर वार केल्याचा आरोप आहे. हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. त्यानंतर आरोपींसोबत असलेल्या फरमान पारकर याने महिलेच्या डाव्या कानातील सुमारे 55 हजार रुपये किमतीचे सोन्याचे वेल जबरदस्तीने काढून घेतले. यामुळे महिलेच्या कानालाही दुखापत झाली.  (Crime News)

घटनेनंतर दोन्ही आरोपी तेथून पसार झाले. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आaले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला.

या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात दिनेश सुराणा आणि फरमान पारकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यामागील नेमके कारण, आरोपींची भूमिका आणि घटनेशी संबंधित इतर बाबींचा पोलीस तपास करत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >