Monday, August 17, 2026

Kirit Somaiya : मुंबईतील 'एसआयआर' मोहिमेत मृत मतदारांची नावे वगळण्याच्या प्रक्रियेत तफावत

Kirit Somaiya : मुंबईतील 'एसआयआर' मोहिमेत मृत मतदारांची नावे वगळण्याच्या प्रक्रियेत तफावत

- किरीट सोमय्यांचा आरोप; निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेदरम्यान मृत मतदारांची नावे वगळण्याच्या प्रक्रियेत गंभीर तफावत असल्याचा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. शिवडी, वरळी, भायखळा, माहीम आणि शिवाजी पार्क यांसारख्या हिंदूबहुल भागांत सात टक्क्यांपर्यंत मृत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत, तर देवनार, गोवंडी, रफिक नगर आणि दर्गा शरीफ यांसारख्या बांगलादेशी मुस्लिम स्थलांतरितांच्या वस्त्यांमध्ये हे प्रमाण अवघे अडीच टक्के दाखवण्यात आल्याचा दावा त्यांनी (Kirit Somaiya) केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांमधील मृत मतदारांच्या नोंदींचा डेटा सादर केला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मृत मतदारांची नावे वगळण्याचे सरासरी प्रमाण ५ ते ७ टक्क्यांच्या दरम्यान आहे. मात्र, मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रात १० हजार ८३ मृत्यू (२.९१ टक्के) आणि अणुशक्तीनगर विधानसभा क्षेत्रात ६ हजार ४५० मृत्यू (२.३६ टक्के) अशी नोंद झाली आहे. संपूर्ण मुंबईत केवळ याच दोन मतदारसंघांमध्ये हे प्रमाण ३ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे त्यांनी नमूद केले.

१९८० नंतर लोकसंख्या वाढलेल्या गोवंडी आणि आसपासच्या संशयास्पद बांगलादेशी मुस्लिम स्थलांतरितांच्या वस्त्यांमध्ये मृत मतदारांची संख्या इतकी कमी का दाखवण्यात आली, याचा अभ्यास होणे गरजेचे असल्याचे सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले. मृत मतदारांची नावे अजूनही मतदार यादीत कायम राहण्यामागे काही गैरप्रकार आहे का, याची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी (Kirit Somaiya) केली आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा