श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी उज्जैन (Ujjain) येथील जगप्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात (Malakaleshwar Temple) महादेवाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी उसळली होती. वर्षातून फक्त एकदाच उघडणाऱ्या नागचंद्रेश्वर मंदिराचे (Naagchandreshwar Temple) दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी रांग लावली होती. याच दरम्यान हरसिद्धी मंदिरासमोरील बॅरिकेड्स लावलेल्या भागात अचानक गर्दीचा ताण वाढला आणि तिथे धावपळ उडाली. या चेंगराचेंगरीसदृश परिस्थितीमुळे अनेक भाविक खाली पडले, तर काहींना गुदमरल्यामुळे चक्कर आली. तेथे उपस्थित असलेले सुरक्षा रक्षक आणि नागरिकांनी त्वरित मदत करत जखमींना गर्दीतून बाहेर काढले व उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. स्थानिक सुत्रांनुसार या घटनेत १३ भाविक जखमी झाले आहेत.
नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्ध अधिकच तीव्र होत असून, रशियाने युक्रेनमधील सर्वात मोठ्या स्टील प्लांटपैकी एकावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला ...
वर्षातून एकदाच मिळणाऱ्या नागचंद्रेश्वर दर्शनासाठी ५.५ लाख भाविक उज्जैनमध्ये
View this post on Instagram
श्रावणाचा तिसरा सोमवार आणि नागपंचमीचा दुर्मिळ योग एकाच दिवशी आल्यामुळे महाकाल आणि नागचंद्रेश्वर मंदिराच्या विशेष दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांचे लोट येत होते. वर्षातून केवळ एकदाच नागपंचमीच्या दिवशी नागचंद्रेश्वर मंदिराचे दरवाजे उघडले जातात, त्यामुळे या दर्शनाचे विशेष महत्त्व असते. एकाच दिवशी तब्बल ५.५ लाख भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मंदिरात कोणतीही अव्यवस्था नाही, प्रशासनाकडून चेंगराचेंगरीच्या बातम्यांचे खंडन
सोशल मीडिया आणि काही बातम्यांवरून मंदिरात गोंधळ आणि अव्यवस्था झाल्याचा दावा केला जात होता. मात्र, महाकालेश्वर मंदिर व्यवस्थापन समितीने हा दावा फेटाळून लावला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नागपंचमी, सावन सोमवार आणि महाकाल देवाची पालखी (सवारी) हे तिन्ही सोहळे एकाच दिवशी आल्यामुळे भाविकांची संख्या ६ लाखांच्या पार पोहोचली होती. गर्दी प्रचंड असली तरी वेगवेगळ्या मार्गांवरून सुलभ दर्शनाची आणि सुरक्षेची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन समितीने केले आहे.
वीज पसरल्याच्या अफवेमुळे निर्माण झाला गोंधळ
प्रत्यक्षात मंदिर परिसरात वीज प्रवाहित झाल्याची एक अफवा पसरली आणि त्यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. हरसिद्धी मंदिरासमोरील डीपीजवळ करंट आल्याची बातमी पसरताच लोकांनी सैरावैरा पळण्यास सुरुवात केली. यात काही लोक बॅरिकेड्सवर आदळले तर काही जण खाली पडले. नीलकंठ द्वाराजवळ काही भाविक घाबरून बॅरिकेड्सवरून पलीकडे उड्या मारतानाही दिसले. मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ही निव्वळ एक अफवा होती आणि भाविकांनी केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा.





