Saturday, August 15, 2026

Nashik : नाशिक पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना केंद्रीय पदकांची घोषणा

Nashik : नाशिक पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना केंद्रीय पदकांची घोषणा

Nashik : केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दिली जाणारी मानाची केंद्रीय अतिउत्कृष्ट सेवा पदक आणि केंद्रीय उत्कृष्ट सेवा पदके २०२६ जाहीर झाली आहेत. यामध्ये नाशिक शहर पोलीस आयुक्तालय, नाशिक परिक्षेत्र आणि महाराष्ट्र पोलीस अकादमीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Police Commissioner Sandeep Karnik) यांच्यासह विविध जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पदक विजेत्यांमध्ये समावेश आहे.

नाशिक शहराचे पोलीस आयुक्त (विशेष पोलीस महानिरीक्षक) संदीप कर्णिक (Police Commissioner Sandeep Karnik) , जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे (Jalgaon Superintendent of Police Shrikant Dhivre), नंदुरबारच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप (Nandurbar Superintendent of Police Ashwini Sanap) आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिकचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे (Anti-Corruption Department Nashik Superintendent of Police Bharat Tangde) यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. तर महाराष्ट्र पोलीस अकादमीचे पोलीस अधीक्षक नंदकुमार टी. ठाकूर (Nandkumar T. Thakur, Superintendent of Police, Maharashtra Police Academy) यांना अतिउत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

नाशिक पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा

नाशिक शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. आंचल मुदगल, उपनिरीक्षक सलीम काझी, ज्ञानदेव राणे, सहायक उपनिरीक्षक विजय लभडे, शेखर फरताळे, शेरखान पठाण, काशिनाथ बागुल आणि हवालदार प्रदीप म्हसदे यांना अतिउत्कृष्ट सेवा पदके जाहीर झाली आहेत. याशिवाय वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की, जगवेंद्रसिंग राजपूत, अंकुश चिंतामण, अशोक शरमाळे, रणजीत नलवडे, सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, चेतन श्रीवंत आणि हवालदार प्रशांत वालझाडे यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे.

ग्रामीणच्या अधिकाऱ्यांचा गौरव

नाशिक ग्रामीण आणि नाशिक परिक्षेत्रातील नाशिक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक घनशाम बाळाप (Nashik Rural Police Inspector Ghansham Balap), पोलीस उपनिरीक्षक किरण शेलार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप यांच्यासह धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील अनेक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही विविध श्रेणीतील पदक विजेत्यांमध्ये समावेश आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासह गुन्हे तपास, तपासातील तत्परता आणि उल्लेखनीय सेवेसाठी या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला आहे. केंद्रीय सेवा पदकांमध्ये नाशिक परिक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेली ही कामगिरी पोलीस दलासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >