बंगळुरू : कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने (CWMA) १२ ऑगस्टपासून पुढील १५ दिवस तमिळनाडूला दररोज १२ हजार क्युसेक पाणी सोडण्याचे आदेश दिल्यानंतर कर्नाटकात तीव्र विरोध सुरू झाला आहे. या आदेशाच्या निषेधार्थ विविध कन्नड संघटनांनी आज, १३ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कर्नाटक बंदची हाक दिली आहे. (Karnataka Bandh)
मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार (CM D.K. Shivakumar) यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे हित जपणे आणि न्यायालयाच्या आदेशांचे पालन करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सरकार योग्य निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. (Karnataka Bandh)
मुंबई : भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी देशभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातही स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य ...
काय सुरू राहणार?
बंददरम्यान बँका, रुग्णालये, औषधांची दुकाने, सार्वजनिक वाहतूक आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. कर्नाटक असोसिएटेड मॅनेजमेंट ऑफ स्कूल्सने (KAMS) शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेतला असून शाळा नेहमीप्रमाणे सुरू राहतील, असे स्पष्ट केले आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळा व्यवस्थापनाला बंदला नैतिक पाठिंबा दर्शवण्यासाठी काळी रिबन किंवा काळी पट्टी बांधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Karnataka Bandh)
बंगळुरूतही जनजीवन सुरळीत ठेवण्याचे आवाहन :
बंगळुरू शहर पोलिसांनी नागरिकांना शांतता आणि सहकार्य राखण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील शाळा-महाविद्यालये, कार्यालये, दुकाने, व्यावसायिक आस्थापना, सार्वजनिक वाहतूक आणि इतर सामान्य व्यवहार सुरू राहतील. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, गस्त आणि सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. (Karnataka Bandh)
१ कोटींहून अधिक प्रवाशांची नोंदणी; ६४ लाखांहून अधिक कार्डे सक्रिय https://prahaar.in/2026/08/13/mumbai-rain-update-rainfall-intensity-to-pick-up-again-in-mumbai-today-moderate-showers-expected-across-the-city-and-suburbs-with-a-possibility-of-heavy-rain-in-some-areas/ मुंबई : ...
हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई :
बंदच्या पार्श्वभूमीवर हिंसाचार, धमकी, सरकारी किंवा खासगी मालमत्तेचे नुकसान, वाहतुकीत अथवा अत्यावश्यक सेवांमध्ये अडथळा निर्माण करणे किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा बंगळुरू पोलिसांनी दिला आहे. कावेरीच्या पाणीवाटपावरून कर्नाटक आणि तमिळनाडूमधील वाद पुन्हा एकदा तीव्र झाला असून, आजच्या बंददरम्यान राज्यातील परिस्थितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Karnataka Bandh)






