मुंबई : भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी देशभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातही स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात शासन परिपत्रक जारी करून ध्वजारोहणासाठी मान्यवरांची नावे जाहीर केली आहेत. (Independence Day 2026)
मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण :
राज्यातील मुख्य शासकीय स्वातंत्र्यदिन सोहळा मंत्रालय, मुंबई येथे सकाळी ९.०५ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यानंतर राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीही वरिष्ठ मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. (Independence Day 2026)
१ कोटींहून अधिक प्रवाशांची नोंदणी; ६४ लाखांहून अधिक कार्डे सक्रिय
मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, आजही शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. आज सकाळी ८ ...
पुण्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण :
पुणे येथे राज्यपालांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी शासन परिपत्रकात नमूद केलेल्या पालकमंत्री किंवा मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. (Independence Day 2026)
कोणत्या जिल्ह्यात कोणाच्या हस्ते ध्वजारोहण?
शासनाने जाहीर केलेल्या यादीप्रमाणे जिल्हानिहाय ध्वजारोहणाची जबाबदारी पुढील मान्यवरांकडे सोपवण्यात आली आहे :
ठाणे - एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे बीड - सुनेत्रा अजित पवार नागपूर - चंद्रशेखर प्रभातजी कृष्णराव बावनकुळे अहिल्यानगर - राधाकृष्ण विखे-पाटील नंदुरबार - हसन सकीना मियालाल मुश्रीफ सांगली - चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्छू पाटील नाशिक - गिरीश गिता दत्तात्रय महाजन पालघर - गणेश सुरेंद्र रामचंद्र नाईक जळगाव - गुलाबराव रेवावजी रघुनाथ पाटील अमरावती - दादाजी रेशमाबाई दगडू भुसे (Independence Day 2026)
मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, आजही शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. आज सकाळी ८ ...
जिल्हा मुख्यालयांवर उत्साहाचे वातावरण :
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा मुख्यालयांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ध्वजारोहणासोबत राष्ट्रगीत, देशभक्तीपर कार्यक्रम आणि विविध शासकीय उपक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, १५ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रातील मुख्य शासकीय स्वातंत्र्यदिन सोहळा मुंबईतील मंत्रालयात सकाळी ९.०५ वाजता पार पडणार असल्याने या कार्यक्रमाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. (Independence Day 2026)




