Nashik : नाशिकच्या रस्त्यांवर आता मनमानी खोदकामाला ब्रेक, एमएनजीएलसाठी मनपाचे कडक नियम

Nashik : नाशिक शहरातील रस्त्यांवरील वारंवार होणारे खोदकाम आणि त्यानंतर निर्माण होणाऱ्या खड्ड्यांच्या समस्येमुळे नाशिककर पुरते वैतागले आहेत. त्यामुळे आता या खड्ड्यांच्या समस्येवर महापालिकेने (Nashik Municipal Corporation) कडक भूमिका घेतली आहे. एमएनजीएलच्या गॅस वाहिनीसाठी होणारे खोदकाम, रस्ते पुनर्स्थापना आणि नागरिकांना होणारा त्रास याबाबत महापालिका प्रशासन आणि एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत खोदकाम आणि रस्ते दुरुस्तीबाबत काही महत्त्वाचे नियम निश्चित करण्यात आले. (Nashik News)



रस्त्याची पुनर्स्थापना नियमांनुसार करा


गॅस वाहिनीचे काम थांबविण्याची महापालिकेची भूमिका नसली, तरी नागरिकांना कमीत कमी त्रास होईल आणि रस्त्यांची अवस्था अधिक खराब होणार नाही, अशा पद्धतीने झाले पाहिजे, यावर बैठकीत भर देण्यात आला. त्यासाठी एमएनजीएलने खोदकाम केल्यानंतर रस्त्याची पुनर्स्थापना योग्य पद्धतीने आणि निर्धारित नियमांनुसार करावी, असे स्पष्ट करण्यात आले. काम सुरू असताना बॅरिकेडिंग, दिशादर्शक फलक आणि आवश्यक सुरक्षा व्यवस्था करणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे काम सुरू असतानाही वाहतूक आणि नागरिकांची दैनंदिन ये-जा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (Nashik News)



एमएनजीएलकडून ‘सॉ कटर’चा वापर


रस्ते खोदताना एमएनजीएलकडून ‘सॉ कटर’चा वापर केला जाणार आहे. त्यामुळे रस्त्याचा कट व्यवस्थित आणि अचूक होऊन पुनर्स्थापनेचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. याशिवाय एमएनजीएलकडून महापालिकेला सविस्तर जीआयएस नकाशा देण्यात येणार आहे. यामध्ये पूर्ण झालेली, सुरू असलेली आणि प्रस्तावित कामांची माहिती असेल. तसेच ग्राहकांच्या तक्रारींसाठी कंपनीचा हेल्पलाइन क्रमांक ४८ तासांत कार्यरत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. घराघरातील गॅस जोडणीच्या नोंदणी प्रक्रियेला गती देण्यासाठी महापालिकेच्या कर विभागातील (Municipal Corporation's Tax Department) कर्मचाऱ्यांची मदत देण्याची तयारीही प्रशासनाने दर्शविली आहे. त्यामुळे गॅस वाहिनीचे काम सुरू ठेवतानाच रस्त्यांची दुरवस्था आणि नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यावर महापालिकेने भर दिला आहे.

Comments
Add Comment

Delhi-Pune SpiceJet Flight : दिल्ली - पुणे विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

नवी दिल्ली : दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना

Simhastha Kumbh Mela 2027 : कुंभमेळ्याच्या गर्दीपूर्वी आपत्ती प्रतिसाद व्यवस्थेचा ‘ग्राउंड चेक’, घाटांची संयुक्त पाहणी

Simhastha Kumbh Mela 2027 : सिंहस्थ कुंभमेळा २०२७मध्ये अपेक्षित असलेल्या मोठ्या भाविक गर्दीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती प्रतिसाद

Ghatkopar Landslide Accident : जखमी नागरिकांना ५० हजारांची मदत तर मृतांच्या वारसांना ४ लाख; महापौर रितू तावडे यांनी केली घोषणा

मुंबई : कुर्ला पश्चिमेतील अशोक नगर, टेकडी क्रमांक ३ येथे बुधवारी (१२ ऑगस्ट २०२६) पहाटेच्या सुमारास भूस्खलनाची

Practical Marathi knowledge for Drivers : प्रवासी वाहनचालकांना आता व्यवहारिक मराठी अनिवार्य! नियम मोडल्यास ३ महिन्यांपर्यंत परवाना निलंबित, पुढे कायमचा रद्द होणार

मुंबई : महाराष्ट्रात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनचालकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Rename Of Clean Mumbai Awareness Campaign : मुंबईत स्वच्छतेच्या कामांत आता 'प्रबोधन' नाही तर 'सेवा'

- ठाकरेंच्या काळातील स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान हे नाव बदलले - भाजपच्या काळात आता बृहन्मुंबई स्वच्छता सेवा

BMC : मुंबईतील ओसी नसलेल्या इमारतींच्या मार्गात अडथळा; स्थायी समितीत प्रस्ताव मंजुरीनंतर महापालिका सभागृहात लटकला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत अनेक विकासकांनी मंजुर आराखड्याची पुतर्ता न करता बांधकाम केले आहे, अशा