Nashik Crime : आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार, प्रकरण दाबण्यासाठी आजीची हत्या ? जिल्ह्यात खळबळ

Nashik Crime News : सिन्नर तालुक्यातुन एक संतापजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील वावी परिसरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घडली असून याप्रकरणी पोलिस तपास सुरू आहे. धक्कादायक म्हणजे दाखल गुन्ह्याची तक्रार मागे घेण्यासाठी पीडितेच्या आजीचे अपहरण करण्यात आले आणि नंतर त्यांची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.


दरम्यान, या प्रकरणाचे पडसाद साेमवारी नाशिक जिल्हा रुग्णालयासमाेर (Nashik Civil Hospital) उमटले. या घटनेच्या निषेधार्थ पीडितेच्या कुटुंबासह कुंभार समाज बांधवांनी सोमवारी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाबाहेर आक्रमक होत रस्ता रोको आंदोलन केले. (Nashik Crime News)



नेमकं प्रकरण काय ?


कुटुंबियांच्या आरोपानुसार, सहा दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणात संशयितांविरुद्ध दाखल तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे आंदाेलनकर्त्यांनी सांगितले. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी पीडितेच्या आजीचे अपहरण करून, हात-पाय बांधून तिला विहिरीत फेकून खून केल्याचा आरोप कुंभार समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. नवयुवक कुंभार समाज विकास संस्थेचे निलेश राऊत यांनी याबाबत प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली असून पाेक्सो कायदा, अपहरण आणि खुनाच्या गुन्ह्याअंतर्गत सर्व पसार संशयितांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. (Nashik Crime News)



प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा


दरम्यान, पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. जोपर्यंत आरोपींना कस्टडीत घेतले जात नाही, तोपर्यंत आजीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक [पवित्राच आंदोलनकर्त्यांनी घेतला. या घटनेमुळे त्र्यंबकराेडवर (Trimbak Road) अचानक धावपळ उडाली. सरकारवाडा पाेलिसांनी (Sarkarwada Police) धाव घेत पुढील कार्यवाही केली. यावेळी उपविभागीय पाेलीस अधिकारी कांतीलाल पाटील, वावीचे पाेलीस निरीक्षक आशिष शेळके व सरकारवाडा पाेलिसांनी आंदाेलनकर्त्यांची समजूत काढली.

Comments
Add Comment

Guidelines for Rainwater Harvesting : जुन्या इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी नियमावली

- नगरविकास विभागाचा निर्णय; नवीन जलनिस्सारण जोडणीचा मार्ग सुलभ मुंबई : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि

YouTube च्या नियमात मोठे बदल! आता नवीन क्रिएटर्ससाठी कमाईचा मार्ग होणार आणखी कठीण

नवी दिल्ली : युट्यूब (YouTube) वरून कमाई करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवीन क्रिएटर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे.

Ashish Shelar : झारखंडमधील विद्यार्थी मारहाणीवर राज-उद्धव ठाकरे गप्प का; मंत्री आशिष शेलार यांचा सवाल

 'मातोश्री' आणि 'शिवतीर्थ'वरून सोयीची

Nashik : त्र्यंबकेश्वर देवस्थानचा व्हीआयपी दर्शनाबाबत मोठा निर्णय

Nashik : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थानने व्हीआयपी दर्शनाबाबत मोठा

Virar Fake Currency : विरारमध्ये बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश! १ कोटींच्या नकली नोटा जप्त; ३० लाखांत विक्रीचा कट उधळला

वसई : वसई क्राईम ब्रँच युनिट-२ ने मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठी कारवाई करत १ कोटी रुपये दर्शनी मूल्य असलेल्या

Nashik : चार महिन्यांपूर्वीचा काँक्रिटीकरण झालेला रस्ता पुन्हा फोडला, नाशिक महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

Nashik : नाशिक शहरातील सीबीएस ते कॅनडा कॉर्नरदरम्यान (CBS to Canada Corner) अवघ्या चार महिन्यांपूर्वी काँक्रिटीकरण करण्यात आलेला