Simhastha Kumbh Mela 2027 : कुंभमेळ्याच्या गर्दीपूर्वी आपत्ती प्रतिसाद व्यवस्थेचा ‘ग्राउंड चेक’, घाटांची संयुक्त पाहणी

Simhastha Kumbh Mela 2027 : सिंहस्थ कुंभमेळा २०२७मध्ये अपेक्षित असलेल्या मोठ्या भाविक गर्दीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती प्रतिसाद व्यवस्था प्रत्यक्ष मैदानावर तपासण्यास सुरुवात झाली आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने (Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela Authority) मंगळवारी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (National Disaster Response Force) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (State Disaster Response Force) अधिकाऱ्यांसमवेत उच्चस्तरीय बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील प्रमुख घाटांची संयुक्त पाहणी करण्यात आली.



आपत्ती प्रतिसाद व्यवस्थेचा ‘ग्राउंड चेक'


कुंभमेळ्याच्या काळात मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने गर्दी व्यवस्थापन, भाविकांची वाहतूक, आपत्कालीन प्रतिसाद आणि विविध यंत्रणांमधील समन्वय यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. आपत्तीच्या प्रसंगी राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दल तसेच अन्य बचाव यंत्रणांची रणनीतीनुसार तैनाती, महत्त्वाची ठिकाणे, आपत्कालीन मार्ग, स्टेजिंग एरिया आणि प्रतिसाद केंद्रे निश्चित करण्याबाबत आढावा घेण्यात आला. आपत्कालीन परिस्थितीत बचाव पथकांना घटनास्थळी कमीत कमी वेळेत पोहोचता यावे, यासाठी महत्त्वाची ठिकाणे आणि प्रवेशमार्ग निश्चित करण्यावर भर देण्यात आला. जल बचाव, गर्दीशी संबंधित आपत्कालीन परिस्थिती तसेच मोठ्या प्रमाणावर जीवितहानीच्या प्रसंगी करावयाच्या उपाययोजनांबाबतही चर्चा झाली.


विविध विभागांकडील मनुष्यबळ, वाहने, उपकरणे आणि अन्य आपत्कालीन संसाधनांची आवश्यकता याचाही आढावा घेण्यात आला. आपत्तीच्या वेळी प्रभावी प्रतिसादासाठी घटना प्रतिसाद प्रणाली, आपत्कालीन सहाय्य व्यवस्था आणि क्षेत्रीय पातळीवरील आंतरविभागीय समन्वय अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. संभाव्य आपत्तीच्या परिस्थितींच्या आधारे संयुक्त सराव आणि प्रात्यक्षिके घेण्याबाबतही चर्चा झाली.



घाटांची संयुक्त पाहणी


बैठकीनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, कुंभमेळा प्राधिकरण आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नाशिकमधील प्रमुख घाटांची संयुक्त पाहणी केली. दसक गंगाघाट, कपिला संगम, नंदिनी संगम, रामकुंड आणि सोमेश्वर घाट या ठिकाणी पाहणी करून भाविकांची संभाव्य गर्दी, आपत्कालीन प्रवेशमार्ग, बचाव पथकांची हालचाल आणि प्रतिसादासाठी आवश्यक बाबींचा आढावा घेण्यात आला. यानंतर पथकाने त्र्यंबकेश्वरकडे रवाना होऊन त्र्यंबकेश्वर घाटाची पाहणी केली. आपत्कालीन परिस्थितीत बचाव पथकांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्यासाठी आवश्यक मार्ग आणि स्थानिक पातळीवरील आपत्ती प्रतिसाद व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.


कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले, कुंभमेळ्यापूर्वी संभाव्य जोखमींची प्रत्यक्ष ठिकाणी ओळख करून त्यानुसार प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलासोबतची बैठक आणि संयुक्त पाहणी त्याचाच एक भाग आहे. संभाव्य धोके ओळखून प्रतिसाद क्षमता वाढविणे आणि सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय निर्माण करण्यावर प्राधिकरणाचा भर आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळा २०२७मध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार असल्याने आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी आणि समन्वयित आपत्कालीन प्रतिसाद अत्यंत महत्त्वाचा आहे. कुंभमेळ्यापूर्वीच सक्षम, समन्वयित आणि क्षेत्रीय पातळीवर प्रभावीपणे कार्य करणारी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारण्यावर आमचा भर आहे.



या संयुक्त बैठकीत आणि पाहणीतून संभाव्य आपत्तींच्या जोखमींची पूर्वओळख, आपत्कालीन प्रतिसादाची क्षमता आणि विविध विभागांमधील क्षेत्रीय समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी पुढील नियोजन करण्यात येणार आहे. कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जुने जिल्हा परिषद कार्यालय येथील प्राधिकरणाच्या सभागृहात बैठक झाली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे आणि प्रशांत पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पुणे पथकाचे कमांडंट संतोष बहादूर सिंह आणि सेकंड-इन-कमांड दीपक तिवारी, तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या धुळे पथकाचे पोलिस निरीक्षक राजूकृष्णन कोल्हे बैठकीस उपस्थित होते.

Comments
Add Comment

'ATAGS' artillery gun is ready : १५ सेकंदात ३ हल्ले आणि ४८ किमीचा अचूक पल्ला; चीन-अमेरिकाही चकित

नवी दिल्ली: रणांगणावर भारताच्या सं

Jalgaon Crime : रस्त्यावर मृत अर्भक आढळल्याने शहरात खळबळ

Jalgaon Crime : जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरातील आंबेडकरनगरात मंगळवारी धाकादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी पहाटे

Nashik : भूकंपाच्या मालिकेनंतर नाशिक प्रशासन सतर्क ! नाशिकमधील धोकादायक इमारतींचे पुनर्सर्वेक्षण

Nashik :नाशिक जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून भूकंपाच्या सौम्य धक्क्यांचे सत्र सुरू आहे. या काळात २.६ ते ४.१ रिश्टर

Delhi-Pune SpiceJet Flight : दिल्ली - पुणे विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

नवी दिल्ली : दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना

Ghatkopar Landslide Accident : जखमी नागरिकांना ५० हजारांची मदत तर मृतांच्या वारसांना ४ लाख; महापौर रितू तावडे यांनी केली घोषणा

मुंबई : कुर्ला पश्चिमेतील अशोक नगर, टेकडी क्रमांक ३ येथे बुधवारी (१२ ऑगस्ट २०२६) पहाटेच्या सुमारास भूस्खलनाची

Nashik : नाशिकच्या रस्त्यांवर आता मनमानी खोदकामाला ब्रेक, एमएनजीएलसाठी मनपाचे कडक नियम

Nashik : नाशिक शहरातील रस्त्यांवरील वारंवार होणारे खोदकाम आणि त्यानंतर निर्माण होणाऱ्या खड्ड्यांच्या समस्येमुळे