Wednesday, August 12, 2026

Nashik News : खरीप पेरणीत नाशिक आघाडीवर, नाशिक विभागात ९४ टक्के पेरण्या पूर्ण

Nashik News : खरीप पेरणीत नाशिक आघाडीवर, नाशिक विभागात ९४ टक्के पेरण्या पूर्ण

Nashik News : दडी मारलेल्या पावसाने अखेर चिंताग्रस्त शेतकऱ्यांना जुलै महिन्यात मोठा दिलासा दिला. पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या खोळंबलेल्या होत्या. मात्र जुलै महिन्यातील पावसाने अखेर शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आणि शेतकऱ्यांची खरिपाच्या पिकासाठी लगबग सुरु झाली. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरपर्यंत नाशिक विभागात ९४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. खरीप पेरणीत नाशिक आघाडीवर असून कोकण सर्वाधिक मागे आहे. (Nashik leads in Kharif sowing)

नाशिक विभागात ९४ टक्के पेरण्या पूर्ण

नाशिक विभागात २० लाख ३३ हजार २५४ हेक्टर इतके सर्वसाधारण पेरणी क्षेत्र असून, त्यापैकी १९ लाख २० हजार ९७५ हेक्टर इतक्या क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे.नाशिक विभागात नाशिक आणि जळगाव या दोन जिल्ह्यांत ९७ टक्के, तर धुळे जिल्ह्यात ९३ टक्के आणि सर्वात कमी ८५ टक्के इतकी पेरणी नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. नागली, बाजरीची सर्वाधिक पेरणी नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. मक्याची सर्व चारही जिल्ह्यांत सर्वसाधारण पेरणी क्षेत्रापेक्षाही जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे. (Nashik leads in Kharif sowing)

खुरसणीची पेरणी केवळ नाशिक जिल्ह्यात

विशेष म्हणजे खुरसणीची पेरणी केवळ नाशिक जिल्ह्यात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात तुरीची सर्वाधिक पेरणी झाली आहे. तर नाशिक जिल्ह्यात उडीद, तीळ या पिकाची सर्वात कमी पेरणी झाली आहे. खुरसणीची पेरणी केवळ नाशिक जिल्ह्यात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात सोयाबीनची सर्वसाधारण क्षेत्राच्या दुप्पट क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कापसाची लागवडदेखील कोणत्याही जिल्ह्यात शंभर टक्के होऊ शकलेली नाही. (Nashik leads in Kharif sowing)

आठ विभागांमध्ये झालेली पेरणी (टक्केवारी)

नाशिक - ९४%

अमरावती -९३%

पुणे -९२%

कोल्हापूर-९०%

छ.संभाजीनगर -९०%

लातूर- ९०%

नागपूर-८०%

कोकण- ६६%

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >