Wednesday, August 12, 2026

Nashik Simhastha Kumbh Mela : पहिल्यांदाच साधुग्रामला स्वतंत्र पोलीस उपायुक्त, कायदा व सुव्यवस्थेसाठी मोठा निर्णय

Nashik Simhastha Kumbh Mela : पहिल्यांदाच साधुग्रामला स्वतंत्र पोलीस उपायुक्त, कायदा व सुव्यवस्थेसाठी मोठा निर्णय

Nashik Simhastha Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासकीय पातळीवर मोठ्या हालचाली सुरु आहेत. कुंभमेळा हा लाखो कोट्यवधी भाविकांच्या आगमनाचा साक्षीदार ठरणार आहे. त्यामुळे एवढी मोठी गर्दी लक्षात घेता तिचे नियोजन करणे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे. त्यामुळे ऐनवेळी पोलिसांची धावपळ होऊ नये म्हणून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. साधुग्राम (Sadhugram) येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यंदा पहिल्यांदाच स्वतंत्र पोलिस उपायुक्तांची (डीसीपी) नेमणूक करण्यात येणार आहे. (Nashik Simhastha Kumbh Mela)

सुरक्षेचा नवा ‘मास्टर प्लॅन’ !

​शहरात साधारण एका पर्वणीला सुमारे २ कोटी, तर संपूर्ण कुंभमेळ्यात ८ कोटी भाविक येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Police Commissioner Sandeep Karnik) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सुरक्षेचा नवा ‘मास्टर प्लॅन’ जाहीर करण्यात आला. शहर पोलिसांनी (City Police) कायदा-सुव्यवस्था, वाहतूक व इतर मुद्द्यांनुसार सिंहस्थाकरीता (Simhastha Kumbh Mela)केलेल्या नियोजनाची माहिती मंगळवारी दिली. त्यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Police Commissioner Sandeep Karnik), सिंहस्थ प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग( Shekhar Singh, Commissioner of the Simhastha Authority), पाेलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, किशोर काळे, चंद्रकांत गवळी, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके, माधव रेड्डी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Nashik Simhastha Kumbh Mela)

गोदापात्रात पहिल्यांदाच ‘वॉटर बॅरिकेडिंग’

यंदा रामकुंड आणि गोदावरी नदीपात्र अरुंद असल्याने दुर्घटनाविरहीत कुंभमेळ्यासाठी यंदा गोदापात्रात पहिल्यांदाच ‘वॉटर बॅरिकेडिंग’ची (Water barricading) मात्रा अवलंबली जाणार आहे. साधुग्राम आणि वाहतूक नियोजनासाठी स्वतंत्र दोन उपायुक्त तैनात केले जाणार असून, मार्चपर्यंत त्यांच्या नियुक्त्या पूर्ण होणार आहेत. सोबतच सुरक्षेत दुपटीने वाढ करण्यात आली असून तब्बल ३५ हजार २५५ पोलिसांचा ताफा तैनात असेल. यात एटीएस, आरएएफ, बीडीडीएस, एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या विशेष तुकड्यांचा समावेश असेल. प्रत्यक्ष गर्दी नियंत्रणासाठी २७ उपायुक्त आणि ४४८ पोलिस निरीक्षक मैदानावर उतरतील. (Nashik Simhastha Kumbh Mela)

कुंभमेळा हा भाविकांसाठी पर्वणी असतो त्यामुळे अनेक लोक कुंभमेळ्याचा साक्षीदार होण्यासाठी येत असतात. मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने गुन्हेगारीचा धोखा देखील संभावतो, त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहे. त्या दृष्टीने साधुग्राम आणि वाहतूक नियोजनासाठी स्वतंत्र दोन उपायुक्त तैनात करण्याचा निर्णय महत्त्वाचा असेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >