मुंबई : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या २१ व्या स्थापना वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (१३ ऑगस्ट) मुंबईतील वरळी डोम, नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (NSCI) येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने स्थापना वर्धापन दिनासोबत परिसंवाद आणि कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले आहे. (Devendra Fadnavis)
सकाळी १० वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन :
गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता वरळी डोम, NSCI येथे कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्रातील जलसंपत्तीचे नियमन, शाश्वत वापर आणि जलव्यवस्थापनातील विविध महत्त्वाच्या विषयांवर यावेळी चर्चा होणार आहे. (Devendra Fadnavis)
नवी दिल्ली : संसदेत सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मी ...
माझगाव डॉकसोबत महत्त्वाचा सामंजस्य करार :
कार्यक्रमादरम्यान माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या कराराअंतर्गत ‘जलप्रशुल्काच्या परिणामाचे मूल्यांकन, प्रकल्पाची सद्यस्थिती आणि उपाययोजना’ या विषयाशी संबंधित बाबींवर सहकार्य करण्यात येणार आहे. (Devendra Fadnavis)
२१ वर्षांच्या वाटचालीचा आढावा :
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला २१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यासोबतच पाण्याच्या गुणवत्तेचे मूल्यांकन, हक्कदारीचे निकष, डिजिटल अहवाल आणि विविध माहितीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या माध्यमातून राज्यातील जलसंपत्तीच्या नियमनाच्या क्षेत्रात प्राधिकरणाने केलेल्या कामाचा आणि भविष्यातील वाटचालीचा आढावा घेतला जाणार आहे. (Devendra Fadnavis)
दिवसभर परिसंवाद आणि कार्यशाळा :
जलसंपत्तीचे नियमन तसेच जलसंपत्तीचा शाश्वत आणि प्रभावी वापर यासंदर्भातील विविध विषयांवर दिवसभर परिसंवाद आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्वेताली ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे चर्चासत्र होणार आहे. यामध्ये राज्यातील जलसंपदा विभागातील विविध महामंडळांचे कार्यकारी संचालक, वरिष्ठ अभियंते तसेच पाणी वापर संस्थांशी संबंधित शेतकरी प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. (Devendra Fadnavis)
Nashik : नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी सातत्याने होणारे भूकंपाचे धक्के चिंतेची बाब ठरत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचे ...
तज्ज्ञांकडून तांत्रिक विषयांवर चर्चा :
कार्यशाळेदरम्यान जलसंपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विविध तांत्रिक आणि धोरणात्मक विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. प्राधिकरणाचे सदस्य राजेंद्र मोहिते आणि डॉ. प्रभात जैन यांच्या अध्यक्षतेखाली विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विषयातील तज्ज्ञ अभियंते, विविध महामंडळांचे कार्यकारी संचालक तसेच प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष आणि सदस्य उपस्थित राहणार आहेत. राज्यातील जलसंपत्तीचा नियमनबद्ध, शाश्वत आणि प्रभावी वापर सुनिश्चित करण्यासाठी भविष्यातील उपाययोजनांवर या कार्यशाळेत विशेष भर दिला जाणार आहे. (Devendra Fadnavis)