Maha Rojgar Melava : पनवेलमध्ये ‘महारोजगारमेळावा २०२६’ला हजारोंचाउत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचासहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ

पनवेल : रोजगाराच्या शोधात असलेल्या आणि स्वतःच्या पायावर उभे राहू इच्छिणाऱ्या हजारो युवक-युवतींसाठी पनवेलमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक उपक्रम पार पडला. भारतीय जनता पार्टी, पनवेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘महारोजगार मेळावा २०२६’ ला तरुण-तरुणींचा अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (CKT) महाविद्यालयात पार पडलेल्या या मेळाव्यात तब्बल ६४ नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवून विविध क्षेत्रांत रोजगाराच्या हजारो संधी एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या.




शिक्षण ते कौशल्य: सर्व, स्तरांतील तरुणांसाठी सुवर्णसंधी


भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या महारोजगार मेळाव्यात दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवारांपासून ते आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर आणि विविध तांत्रिक कौशल्ये असलेल्या तरुणांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सकाळपासूनच महाविद्यालयाच्या प्रांगणात युवक-युवतींची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.


माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्याचे उद्घाटन पनवेलचे महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, नगरसेवक परेश ठाकूर, उपमहापौर प्रमिला पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, स्थायी समिती सभापती बबन मुकादम यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




६४ कंपन्यांचा सहभाग आणि मुलाखतीची थेट प्रक्रिया


या मेळाव्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स, एक्सिस बँक, टाटा स्ट्राइव्ह, झेप्टो, मुथूट फायनान्स, कोटक बँक, महिंद्रा इंटिग्रेटेड बिझनेस सोल्युशन्स, सुईडेक्सो, तसेच टाइम्सप्रो यांसारख्या तब्बल ६४ नामांकित औद्योगिक व व्यावसायिक कंपन्यांनी सहभाग घेतला. कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांशी थेट संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि कौशल्याच्या आधारावर विविध पदांसाठी मुलाखती घेतल्या. या प्रक्रियेमुळे २५०२ हून अधिक उमेदवारांना थेट रोजगाराच्या संधी, करिअरविषयक मार्गदर्शन आणि उद्योग क्षेत्रातील आवश्यक गरजांची सखोल माहिती मिळाली.



शिस्तबद्ध आयोजन आणि उत्कृष्ट व्यवस्थापन


हजारो उमेदवारांची मोठी उपस्थिती असतानाही संपूर्ण मेळावा अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पडला. उमेदवारांची नोंदणी करण्यासाठी विशेष कक्ष, कंपन्यांची माहिती फलक, मुलाखतीसाठी स्वतंत्र व्यवस्था आणि आवश्यक सुविधांमुळे कोणतीही अडचण आली नाही. आयोजक, स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे हा सोहळा अत्यंत यशस्वी ठरला.




युवकांना आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प


आजच्या स्पर्धात्मक युगात युवकांना केवळ पुस्तकी शिक्षण नव्हे, तर त्यांच्या कौशल्याला योग्य न्याय देणारी रोजगार संधी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. हीच गरज ओळखून आयोजित केलेल्या या मेळाव्यामुळे पनवेल आणि परिसरातील तरुणांना थेट उद्योग क्षेत्राशी जोडले जाण्याचे व्यासपीठ मिळाले. भविष्यातही अशा प्रकारच्या उपक्रमांना पूर्ण प्रोत्साहन दिले जाईल, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला. या मेळाव्यात सहभागी झालेल्या युवकांनीही आयोजनाचे भरभरून कौतुक केले असून, ‘महारोजगार मेळावा २०२६’ हा पनवेलच्या औद्योगिक व सामाजिक विकासाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड ठरला आहे.

Comments
Add Comment

Sara Tendulkar : प्रेक्षकांचे वेधले लक्ष; सारा तेंडुलकरचा स्पेन मधील ग्लॅमरस लुक

भारतीय क्रिकेटचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावरील सर्वाधिक चर्चेत

Nashik News : विशेष महासभेत सहा मृतांच्या कुटुंबीयांना धनादेश वितरित

Nashik News : नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांत नाशिकचे रस्ते, त्यातील खड्डे आणि त्या खड्ड्यांमुळे झालेले अपघात चर्चेच्या

प्लास्टिकमुळे कॅन्सर; पिण्याच्या पाण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटली सुरक्षित आहे का ?

प्लॅस्टिक आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा भाग झाला आहे. परंतु संशोधनातून असे समोर आले आहे की

Arjun Ranatunga : श्रीलंकेच्या क्रिकेटरचा नवा लुक चर्चेत; बॅरिएट्रिक सर्जरी म्हणजे काय? चला जाणून घेऊया

अर्जुन रणतुंगानी तब्बल ७२ किलो वजन कसे कमी केले ? श्रीलंकेचे माजी क्रिकेट कर्णधार अर्

Jalgaon Airport : जळगाव विमानतळ विस्ताराला वेग ! जमीन मोजणी तातडीने पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Jalgaon Airport : जळगाव विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाच्या कामाला आता गती मिळण्याची शक्यता आहे. विमानतळ

Jalna : कॉलेजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि चौघे जखमी

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना