प्लास्टिकमुळे कॅन्सर; पिण्याच्या पाण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटली सुरक्षित आहे का ?

प्लॅस्टिक आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा भाग झाला आहे. परंतु संशोधनातून असे समोर आले आहे की प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिताना नकळत मायक्रोप्लास्टिक्स शरीरात जातात. हे प्लास्टिकचे अत्यंत सूक्ष्म कण शरीरात जमा होतात आणि हार्मोन्स, आतडे, मेंदू आणि कर्करोग अश्या आजारांचे धोके निर्माण होतात.


संशोधनानुसार मायक्रोप्लास्टिक्समुळे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात:


आतड्यांचे आरोग्य : सूक्ष्म कणांमुळे शरीराच्या ऊतींमध्ये सूज येऊ शकते, तसेच पचनसंस्थेतील उपयुक्त बॅक्टेरियांचे (Gut Bacteria) संतुलन बिघडू शकते.


श्वसन, प्रजनन आणि मज्जासंस्था : प्राथमिक अभ्यासांनुसार मायक्रोप्लास्टिक्सचा थेट संबंध श्वसनाचे विकार, प्रजनन आरोग्याच्या समस्या आणि मज्जासंस्थेवर (Nervous System) होणाऱ्या परिणामांशी जोडला गेला आहे.


लहान मुलांवर परिणाम : एका अभ्यासात असे आढळले की, ज्या मुलांच्या लघवीमध्ये प्लास्टिकच्या चयापचयाचे (Plastic Metabolites) प्रमाण जास्त होते, त्यांची स्मरणशक्ती चाचणीत (Memory Tests) कामगिरी खालावली होती.


हार्मोनल असंतुलन : प्लास्टिकमधून BPA (Bisphenol A) आणि Fthalates सारखी घातक रसायने पाण्यात मिसळतात, ज्यामुळे मानवी संप्रेरकांमध्ये (Hormones) अडथळा निर्माण होतो.



कर्करोगाचा धोका :


दीर्घकाळ प्लास्टिकच्या संपर्कात राहिल्याने कर्करोगाचा धोका वाढतो का?


प्लास्टिकचे कण शरीरात साचल्यामुळे आणि त्यातून स्त्रवणाऱ्या घातक रसायनांमुळे दीर्घकाळात कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो, असे अनेक प्राथमिक अभ्यासांतून स्पष्ट झाले आहे.
मायक्रोप्लास्टिक्सचा संपर्क जितका जास्त, तितका आजारांचा धोका जास्त हे स्पष्ट आहे. त्यामुळे प्लॅस्टिक चा वापर कमी करणे हाच सर्वात समजूतदारपणाचा मार्ग आहे.


प्लास्टिकचा संपर्क कमी करण्यासाठी कोणते उपाय करावे :


Water Bottle : पाण्यासाठी युझ-अँड-थ्रो प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी स्टेनलेस स्टील किंवा काचेच्या बाटल्यांचा वापर करा. साध्या प्लास्टिकच्या बाटल्या पुन्हा पुन्हा वापरू नका; विशेषतः जर त्या गरम वातावरणात किंवा उन्हात ठेवल्या गेल्या असतील.

Water Filter : नळाचे पाणी पिण्यासाठी वापरत असाल तर योग्य अल्ट्राफिल्ट्रेशन (UF) सिस्टीम वापरा. ज्यामुळे ९९% पर्यंत मायक्रोप्लास्टिक्स निघून जातात.


Microwave\Oven : मायक्रोवेव्हमध्ये प्लास्टिकच्या भांड्यात अन्न गरम करणे किंवा प्लास्टिकमध्ये गरम द्रवपदार्थ ओतणे पूर्णपणे टाळा. उष्णतेमुळे प्लास्टिकचे कण अन्नपदार्थात वेगाने मिसळतात.


गरम किंवा ॲसिडिक/आंबट अन्नपदार्थ प्लास्टिक कंटेनरमध्ये ठेवण्याऐवजी काच किंवा स्टीलच्या भांड्यात ठेवा.



वापरासाठी सुरक्षित भांडी :


स्टेनलेस स्टील (stainless steel) : हे अत्यंत दणकट आणि सुरक्षित साहित्य आहे. यातून कोणतेही कण किंवा रसायने पाण्यात मिसळत नाहीत.


काच (Glass) : अन्न आणि पेयांसाठी काच हा सर्वात उत्तम व सुरक्षित पर्याय आहे. विशेषतः गरम पदार्थांसाठी काचेची भांडी वापरल्यास रसायने किंवा मायक्रोप्लास्टिक्सचा धोका शून्य असतो.


BPA-Free प्लास्टिक (मर्यादित वापर) : जरी हे सामान्य प्लास्टिकपेक्षा चांगले असले, तरी 'BPA-Free' म्हणजे मायक्रोप्लास्टिक-मुक्त असा अर्थ होत नाही. त्यामुळे स्टील किंवा काच उपलब्ध नसेल तेव्हाच दुय्यम पर्याय म्हणून याचा वापर करावा.


प्लास्टिक पूर्णपणे बंद करणे कठीण हे एक कटू सत्य आहे पण, काच आणि स्टेनलेस स्टीलच्या बाटल्यांचा वापर करणे, पाणी योग्यरीत्या फिल्टर करणे आणि प्लास्टिकला उष्णतेपासून दूर ठेवणे यासारख्या छोट्या बदलांमुळे आपण आपल्या कुटुंबाचे मायक्रोप्लास्टिक्सच्या धोक्यापासून रक्षण करू शकतो!

Comments
Add Comment

Dahi Handi : संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात होणार अभिजात समृद्ध मराठी भाषेचा गौरव, १० थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ११ लाखाचे पारितोषिक मिळणार

ठाणे : संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे शनिवार ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १० यावेळेत दहीहंडी उत्सवाचे

Jalgaon Crime : दोन तरुणांशी वाद अन् बियर बार मालक सरपंचाचा हवेत गोळीबार , नेमकं काय घडलं ?

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे गुरुवारी रात्री हवेत गोळीबार केल्याच्या घटनेने खळबळ

Shalarth ID Scam : शालार्थ आयडी घोटाळ्यातील संशयित संजय गरुड यांचा जामीन अर्ज मागे

Shalarth ID Scam : नाशिकच्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यातील संशयित आणि शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड

Raksha Bandhan AI Prompts : रक्षाबंधन होईल अतिशय खास! फक्त हे सोपे AI Prompts वापरा अन् बनवा भावा-बहिणीचे सर्वात सुंदर फोटो

सध्या सोशल मीडियावर AI फोटो जनरेशनचा मोठा ट्रेंड सुरू आहे. या रक्षाबंधनाला भाऊ आणि बहिणीचे

Nashik : आदिवासी कुटुंबाच्या जमिनीवरून वाद, मनपा अधिकाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा

Nashik : नाशिकच्या दिंडोरी जकात नाका परिसरात आदिवासी कुटुंबाच्या ताब्यातील जमिनीवरील शेड हटवून जागा बळकावण्याचा

Raksha Bandhan Gifts 2026 : रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला चुकूनही देऊ नका ही गिफ्ट्स; मानली जातात अशुभ!

मुंबई : रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, तर