Nashik News : नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांत नाशिकचे रस्ते, त्यातील खड्डे आणि त्या खड्ड्यांमुळे झालेले अपघात चर्चेच्या स्थानी आहे. खड्ड्यांमुळे आतापर्यंत ६ जणांना जीव गमवावा लागला आहे. मात्र अशातच आता नाशिक पालिका मृतांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी पुढे आली आहे.
नाशिक शहर आणि परिसरातील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत मृत्यू पावलेल्या सहा नागरिकांच्या वारसांना नाशिक महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येकी पाच लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात आली.
Nashik Accident News : नाशिक जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. देवळा-मालेगाव रस्त्यावरील पिंपळगाव (वा.) जवळ अर्टिगा कार आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या ...
खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत (Potholes Accident) जितेंद्रसिंग मंगलसिंग गिरासे, प्रभाकर साहेबराव निकम, उज्वला शांताराम गायकवाड, दिपाली दिलीप बेळे, निलेश प्रल्हाद कोतकर आणि मासुम भिकन शाह यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना (Family) प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत (Help) देण्यात आली.
शनिवारी झालेल्या विशेष महासभेत महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री, गटनेते, पदाधिकारी आणि संबंधित प्रभागातील नगरसेवकांच्या उपस्थितीत वारसांना धनादेश वितरित करण्यात आले.