Jalna : कॉलेजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि चौघे जखमी

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत बांधकामस्थळी उपस्थित असलेल्या एका मजुराचा मृत्यू झाला. इतर चार मजूर जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.



स्लॅब कोसळताच बांधकामस्थळी उपस्थित असलेल्या इतर मजुरांनी लगेच मदतकार्य सुरू केले. कोसळलेल्या स्लॅबचा ढिगारा उपसण्याचे प्रयत्न सुरू केले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. दुर्घटनेचा आवाज ऐकून आसपास उपस्थित स्थानिक पण मदतीसाठी सरसावले. तातडीने जेसीबीची व्यवस्था करून ढिगारा उपसण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले. कोसळलेल्या स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चार मजुरांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले.



हाती आलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेत मोतीलाल रामजी मिरगे (५०, रा. मुठाड, ता. भोकरदन) यांचा मृत्यू झाला. तर कृष्णा नामदेव हिरे (३०, रा. दगडवाडी), कृष्णा विठ्ठल शिंदे (४०, रा. वाकडी), फारुख खा शारूख खा (३८, रा. दानापूर) आणि लक्ष्मण गणेश ठोंबरे ३०, रा. सुरंगळी) हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने भोकरदन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळला. या दुर्घटनेमागचे कारण अद्याप समजलेले नाही. पोलीस तपास सुरू आहे. बांधकाम करताना झालेली चूक अथवा निकृष्ट साहित्याचा वापर करून केलेले बांधकाम या दोन पैकी एका कारणामुळे दुर्घटना झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि

Amravati : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूची NHRCकडून स्वतःहून दखल; महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस

अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा