Arjun Ranatunga : श्रीलंकेच्या क्रिकेटरचा नवा लुक चर्चेत; बॅरिएट्रिक सर्जरी म्हणजे काय? चला जाणून घेऊया

अर्जुन रणतुंगानी तब्बल ७२ किलो वजन कसे कमी केले ?


श्रीलंकेचे माजी क्रिकेट कर्णधार अर्जुन रणतुंगा यांच्या वजनातील मोठ्या बदलामुळे प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. हे कसे शक्य झाले?, कोणते उपाय केले? असे प्रश्न सगळेच विचारत आहेत.
या वेटलॉस साठी त्यांनी कोणती शस्त्रक्रिया केली का? याबद्दल सविस्तर जाणून घ्या.


Bariatric Surgery : बॅरिएट्रिक सर्जरी


बॅरिएट्रिक सर्जरी ही लठ्ठपणा आणि चयापचयाशी (Metabolic) संबंधित आजारांवर मात करण्यासाठी अत्यंत शास्त्रीय व वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेला उपचार आहे.


बॅरिएट्रिक सर्जरी म्हणजे काय? आणि ती कोणासाठी आवश्यक आहे?


बॅरिएट्रिक सर्जरीमध्ये पोटाचा (Stomach) आकार लहान केला जातो आणि अन्नाचा पचनसंस्थेतील प्रवास बदलला जातो (उदा. स्लीव्ह गॅस्ट्रोक्टॉमी किंवा गॅस्ट्रिक बायपास). यामुळे अन्नाचे प्रमाण तर कमी होतेच, पण भूक आणि साखरेचे नियंत्रण करणाऱ्या संप्रेरकांमध्येही (Hormones) सकारात्मक बदल होतो.


BMI : ज्या व्यक्तींचा BMI 40 किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना ही सर्जरी सुचवली जाते.


इतर आजार असल्यास : जर BMI 35 किंवा त्याहून अधिक असेल आणि सोबत मधुमेह, उच्च रक्तदाब (High BP), स्लीप ॲप्निया (निद्रानाश/घोरणे), फॅटी लिव्हर किंवा सांधेदुखी यांसारखे आजार असतील, तर ही शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो.



शस्त्रक्रियेतील धोके :


सुरक्षितता :-


लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया पोटविकारांच्या इतर सामान्य शस्त्रक्रियांसारखीच सुरक्षित झाली आहे. शस्त्रक्रियेपेक्षा उपचार न केलेला लठ्ठपणा हा जास्त धोकादायक असतो, ज्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि कर्करोगाचा धोका वाढतो.


वाजनातील बदल :


वजन कमी होणे -


प्रत्येक व्यक्तीचे वजन कमी होण्याचे प्रमाण वेगळे असते. ते सुरुवातीचे वजन, वय, शारीरिक हालचाल आणि आहाराच्या सवयींवर अवलंबून असते. त्यामुळे स्वतःची तुलना इतरांच्या ट्रान्सफॉर्मेशनशी (Transformation) करू नये.


शस्त्रक्रियेनंतरचा आहार आणि जीवनशैलीतील बदल


शस्त्रक्रियेनंतर आहाराची सुरुवात द्रवपदार्थांपासून (Liquids) होऊन हळूहळू मऊ अन्न आणि नंतर संतुलित अन्नाकडे केली जाते.



आहाराचे नियम - आहार छोट्या भागात विभागून घ्यावा. (Small Portions) घेणे, अन्न नीट चावून खाणे, प्रथिनांना (Protein) प्राधान्य देणे आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.


काय टाळावे - गोड पेये आणि जास्त प्रक्रिया केलेले अन्न पूर्णपणे टाळावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जीवनसत्त्वे आणि खनिजांचे सप्लिमेंट्स दीर्घकाळ घ्यावे लागतात.


केवळ वजन कमी होणे नव्हे, तर 'आरोग्यात सुधारणा' हाच मुख्य उद्देश :


आजारांतून मुक्ती/नियंत्रण - या सर्जरीमुळे टाईप 2 मधुमेह पूर्णपणे बरा होऊ शकतो किंवा नियंत्रणात येतो. उच्च रक्तदाब, स्लीप ॲप्निया, फॅटी लिव्हर आणि सांधेदुखीमध्ये मोठी सुधारणा होते.


महिलांचे आरोग्य :


लठ्ठपणामुळे महिलांमध्ये होणारे संप्रेरकांचे असंतुलन (Hormonal disorders) सुधारून प्रजननक्षमता (Fertility) वाढण्यास मदत होते. वजनाच्या काट्यावरील आकड्यांपेक्षा या आजारांमधून मिळणारा दिलासा जीवनमान सुधारतो.


शस्त्रक्रियेचे यश :
या शस्त्रक्रियेचे यश डॉक्टर, आहारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट आणि रुग्ण यांच्या समन्वयावर अवलंबून असते. शस्त्रक्रियेनंतरचा पहिला वर्षभराचा काळ नवीन निरोगी सवयी लावण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो.


अंतिम ध्येय :


केवळ बारीक दिसणे हे याचे ध्येय नाही. लठ्ठपणाशी संबंधित आजारांचा त्रास कमी करणे, हालचाल सुलभ करणे, मानसिक आरोग्य सुधारणे आणि निरोगी आयुष्य जगणे हेच बॅरिएट्रिक सर्जरीचे खरे यश आहे.
सेलिब्रिटींचे मेकओव्हर हे प्रेरणेसाठी ठीक आहेत, परंतु लठ्ठपणा हा एक गंभीर आणि वैद्यकीय आजार आहे हे समजून घेतले पाहिजे. बॅरिएट्रिक सर्जरी हा कोणताही शॉर्टकट नसून, योग्य जीवनशैली आणि वैद्यकीय मार्गदर्शनासह आरोग्याला दीर्घायुष्य देणारा एक सिद्ध उपचार मार्ग आहे!



Comments
Add Comment

Dahi Handi : संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात होणार अभिजात समृद्ध मराठी भाषेचा गौरव, १० थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ११ लाखाचे पारितोषिक मिळणार

ठाणे : संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे शनिवार ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १० यावेळेत दहीहंडी उत्सवाचे

Jalgaon Crime : दोन तरुणांशी वाद अन् बियर बार मालक सरपंचाचा हवेत गोळीबार , नेमकं काय घडलं ?

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे गुरुवारी रात्री हवेत गोळीबार केल्याच्या घटनेने खळबळ

Shalarth ID Scam : शालार्थ आयडी घोटाळ्यातील संशयित संजय गरुड यांचा जामीन अर्ज मागे

Shalarth ID Scam : नाशिकच्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यातील संशयित आणि शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड

Raksha Bandhan AI Prompts : रक्षाबंधन होईल अतिशय खास! फक्त हे सोपे AI Prompts वापरा अन् बनवा भावा-बहिणीचे सर्वात सुंदर फोटो

सध्या सोशल मीडियावर AI फोटो जनरेशनचा मोठा ट्रेंड सुरू आहे. या रक्षाबंधनाला भाऊ आणि बहिणीचे

Nashik : आदिवासी कुटुंबाच्या जमिनीवरून वाद, मनपा अधिकाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा

Nashik : नाशिकच्या दिंडोरी जकात नाका परिसरात आदिवासी कुटुंबाच्या ताब्यातील जमिनीवरील शेड हटवून जागा बळकावण्याचा

Raksha Bandhan Gifts 2026 : रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला चुकूनही देऊ नका ही गिफ्ट्स; मानली जातात अशुभ!

मुंबई : रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, तर