Thursday, August 6, 2026

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; घाट परिसर, कोकण आणि मराठवाड्यात सतर्कतेचे आवाहन

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; घाट परिसर, कोकण आणि मराठवाड्यात सतर्कतेचे आवाहन
मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम असून पुढील तीन दिवस काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर, कोकण आणि मराठवाड्यात नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Rain) हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 7 ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच कोकण आणि गोव्यातही काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. (Weather Update) मुंबई आणि उपनगरांमध्ये आज दिवसभर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. शहराचे कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (IMD)
8 ऑगस्ट रोजी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज आहे. 9 ऑगस्टलाही या भागांमध्ये अशाच प्रकारचे हवामान कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. (Mumbai Rain) दरम्यान, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानेही पावसाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा दिला आहे. जानेवारी 2026 पासून आतापर्यंत राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून एकूण 1,698 अलर्ट जारी करण्यात आले आहेत. याशिवाय वीज पडणे, अतिवृष्टी आणि भूस्खलनासंदर्भात 285 विशेष इशारे देण्यात आले आहेत. ( Konkan Rain) हवामान खात्याकडून मिळणाऱ्या पूर्वसूचना आणि रिअल-टाइम अलर्टच्या आधारे स्थानिक प्रशासनाला वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पूर आणि अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांची मिळून 23 पथके राज्यातील संवेदनशील भागांमध्ये तैनात करण्यात आली आहेत. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत आणि बचावकार्य करण्यासाठी ही पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. (Heavy Rain)  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >