Friday, August 7, 2026

Healthy Juice : तुम्ही कधी ABC ज्यूस प्यायला आहे का? कसा बनवायचा आणि शरीराला काय फायदे होतात?

Healthy Juice : तुम्ही कधी ABC ज्यूस प्यायला आहे का? कसा बनवायचा आणि शरीराला काय फायदे होतात?

ABC ज्यूस म्हणजे काय? चला जाणून घेऊया :

सध्या सोशल मीडियावर ABC ज्यूस चे व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. हे एक आरोग्यदायी पेय आहे आणि प्यायलाही स्वादिष्ट आहे.मग उशीर कशासाठी? चला तर मग जाणून घेऊया ABC ज्यूस कसं बनवतात: ABC चे पूर्ण रूप (Fullform): A- Apple (सफरचंद) B- Beetroot (बीट) C- Carrot (गाजर) Apple, Beetroot आणि Carrot यांपासून तयार होतो ABC ज्यूस. ABC ज्यूस चे फायदे : हा रस प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होऊ शकते तसेच, शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. जे लोक वारंवार आजारी पडतात त्यांच्यासाठी हे पेय फायदेशीर ठरू शकते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात. या ज्यूस मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते त्यामुळे पोटाच्या समस्या देखील दूर होतात. निरोगी त्वचा: ज्यांना आपली निरोगी त्वचा टिकवून ठेवायची आहे, त्यांनी या रसाचा आपल्या दैनंदिन दिनचर्येत समावेश करावा. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला आतून निरोगी ठेवून तिची चमक टिकवून ठेवण्यास मदत करतात. निरोगी डोळे : या रसामध्ये व्हिटॅमिन A चांगल्या प्रमाणात असते, जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. ज्यांना आपली दृष्टी सुधारायची आहे, त्यांच्यासाठी हे पेय एक चांगला पर्याय ठरू शकते. निरोगी हृदय : या रसाचे नियमित सेवन केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो. जर तुम्हाला निरोगी हृदय राखायचे असेल, तर तुमच्या आहारात या रसाचा नक्की समावेश करा. ABC ज्यूस कसा बनवायचा? साहित्य: सफरचंद, बीट, गाजर, आले, चवीनुसार मीठ, लिंबू आणि पाणी कृती :
  • सफरचंद, बीट आणि गाजर स्वच्छ धुवून त्याचे लहान तुकडे करा.
  • कापलेले फळांचे तुकडे आणि आले मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करा.
  • रस गाळून घ्या त्यात चवीसाठी लिंबाचा रस आणि चिमूटभर काळे मीठ घालून प्या.
   
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा