Wednesday, August 5, 2026

Navnath Ban : 'सुनेत्रा पवारांवरील टीकेचे समर्थन करणारे संजय राऊत म्हणजे 'ढोंगी गुड्डा'; भाजपचे नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार

Navnath Ban : 'सुनेत्रा पवारांवरील टीकेचे समर्थन करणारे संजय राऊत म्हणजे 'ढोंगी गुड्डा'; भाजपचे नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याविरोधातील वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. काँग्रेसच्या टीकेचे समर्थन करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतलेल्या भूमिकेवर भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी बुधवारी (५ ऑगस्ट) जोरदार निशाणा साधला. "एका महिलेचा अपमान होत असताना त्याचे समर्थन करणारे संजय राऊत म्हणजे 'ढोंगी गुड्डा' (Dhongi Gudda) आहेत," असा घणाघात त्यांनी केला.

भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन म्हणाले की, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना 'गुंगी गुडिया' म्हणण्यात काहीच गैर नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसच्या बालिश टीकेचे समर्थन केले. एखाद्या महिलेचा अवमान होत असताना त्याचा निषेध करण्याऐवजी त्याला पाठिंबा देणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी (Navnath Ban) म्हटले.

यावेळी त्यांनी (Navnath Ban) उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरही टीकेची झोड उठवली. "महाराष्ट्रात सातत्याने ढोंगाचे राजकारण करणारे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत जर अशाच प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयीही अपमानास्पद भाषा वापरणार असतील, तर त्यांनाच 'ढोंगी गुड्डा' (Dhongi Gudda) म्हणावे लागेल," असा टोला बन यांनी लगावला.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर व्यक्ती म्हणून नव्हे, तर उपमुख्यमंत्री म्हणून टीका झाली असल्याचे म्हटल्याचा संदर्भ देत बन म्हणाले, "मग हाच निकष सर्वांना लागू व्हायला हवा. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केलेली टीका, कंगना रणौत प्रकरण, मोहित कंबोज यांना पाठवलेली नोटीस आणि पत्रकार निखिल वागळे यांच्या कार्यालयावर झालेला हल्ला यावेळी हा न्याय कुठे गेला होता?" असा सवाल त्यांनी (Navnath Ban) उपस्थित केला.

सुनेत्रा पवार या सातत्याने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत असल्याचा दावा करत बन म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे लोकांमध्ये राहून काम करत आहेत. "घरात कोण बसते आणि जनतेसाठी कोण काम करते, हे महाराष्ट्रातील जनतेला चांगले माहिती आहे," असे ते (Navnath Ban) म्हणाले.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी उद्धव ठाकरे गटावर टीका केली. "भाजप आणि शिवसेनेची २५ वर्षांची युती ही हिंदुत्वाच्या विचारांवर उभी होती. मात्र आज उबाठा गटाचा हिंदुत्वाशी काहीही संबंध उरलेला नाही. जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांची भूमिका स्वीकारली जात नाही, तोपर्यंत युतीचा प्रश्नच उद्भवत नाही," असे बन (Navnath Ban) यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत यांच्या भाषाशैलीवर टीका करताना त्यांनी स्वप्ना पाटकर यांच्याविषयी राऊत यांनी वापरलेल्या भाषेचाही उल्लेख केला. "महिलांचा सन्मान करण्याचे धडे देणाऱ्या संजय राऊतांनी स्वतः भूतकाळात कोणती भाषा वापरली होती, हे महाराष्ट्राने पाहिले आहे. रोज सकाळी माध्यमांसमोर येऊन शिवीगाळ करणे आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर करणे, हीच त्यांची शैली झाली आहे. महाराष्ट्र त्यांच्या या भाषेला कंटाळला आहे," असा आरोप नवनाथ बन यांनी केला. (Navnath Ban)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >