राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मंत्रालय परिसरात आंदोलन; काँग्रेसने जाहीर माफी मागण्याची मागणी
मुंबई : उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसने वापरलेल्या 'गुंगी गुडिया' या शब्दावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वक्तव्याचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटत असून बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबईत मंत्रालय परिसरात जोरदार निदर्शने केली. काँग्रेसने या आक्षेपार्ह टिप्पणीबाबत तातडीने जाहीर माफी मागावी, अशी मागणी करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी 'गुंगी नाही, वादळ आहे' अशा घोषणांनी मंत्रालय परिसर दणाणून सोडला. काँग्रेसच्या या वक्तव्याविरोधात नाशिक, पुणे आणि मुंबईसह राज्यातील विविध भागांत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईत पोलीस परवानगी नसतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जमा झाले. कार्यकर्त्यांचा वाढता संताप आणि गर्दी पाहता पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Bombay High Court : नितीन गडकरींशी संबंधित बदनामीकारक मजकूर त्वरित हटवा!
मुंबई उच्च न्यायालय; डीपफेक व्हिडिओ आणि आक्षेपार्ह मजकूर हटवण्याचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना निर्देश मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग ...
Nashik : नाशिक महापालिकेने ११,६०९ खड्डे बुजवले, रस्ते दुरुस्तीची मोहीम युद्धपातळीवर
Nashik : मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांची समस्या वाढली असतानाही नाशिक महानगरपालिकेने (Nashik Municipal Corporation) युद्धपातळीवर दुरुस्ती मोहीम राबविली ...






