Tuesday, August 25, 2026

Kriti Sanon : डीप-नेक ब्लाउज अन् 'वोक अजेंडा'चे आरोप; रक्षाबंधन जाहिरातीतील ट्रोलिंगवरून कृती सेननचं सडेतोड उत्तर

Kriti Sanon : डीप-नेक ब्लाउज अन् 'वोक अजेंडा'चे आरोप; रक्षाबंधन जाहिरातीतील ट्रोलिंगवरून कृती सेननचं सडेतोड उत्तर

अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) सध्या एका रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. या जाहिरातीत तिने परिधान केलेल्या कपड्यांवरून काही नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका करत, तिला भारतीय संस्कृती आणि परंपरांची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. जाहिरातीत कृतीने आयव्हरी रंगाचा लेहेंगा आणि डीप-नेक ब्लाउज घातला होता, जो काहींना अयोग्य वाटला तर काहींनी याला 'वोक अजेंडा' असा शिक्का मारला. मात्र, या सर्व ट्रोलिंगला शांत न बसता कृतीने अत्यंत सडेतोड आणि विचार करायला लावणारं उत्तर दिलं आहे.

आपली बाजू मांडताना कृतीने स्पष्ट केलं की, कोणत्याही सणाची खरी भावना ही तुम्ही परिधान केलेल्या कपड्यांमध्ये नसून ती तुमच्या मनातील नितांत प्रेमात आणि जपलेल्या परंपरांमध्ये असते. रक्षाबंधन हा केवळ एका विशिष्ट चौकटीतले कपडे घालून साजरा करण्याचा सण नसून तो भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि संरक्षणाचा उत्सव आहे. कृतीने आपल्या कौटुंबिक परंपरेबद्दल सांगताना नमूद केलं की, ती आणि तिची बहीण स्वतः एकमेकींना राखी बांधून एकमेकींच्या सुरक्षिततेचं आणि आनंदाचं वचन देतात. एवढंच नाही तर त्यांच्या घरातील पाळीव कुत्रेही या कुटुंबाचा भाग असल्याने तेही या उत्साहात सामील असतात.

या निमित्ताने कृतीने महिलांच्या कपड्यांवरून त्यांच्या संस्कृतीचा आदर ठरवण्याच्या मानसिकतेवर थेट बोट ठेवलं आहे. 'महिलांनी काय घालावं आणि काय नाही, हे समाजाने सांगणं कधी थांबणार ?' असा परखड सवाल करत तिने म्हटलं की, काळानुसार फॅशन बदलते पण संस्कृती मनात जपावी लागते. एखाद्या स्त्रीचा तिन्ही परिधान केलेल्या कपड्यांच्या 'नेकलाइन'वरून संस्कृतीशी असलेला संबंध जोडणे चुकीचे आहे. UNFPA ची लैंगिक समानतेची ब्रँड अॅम्बेसेडर असलेल्या कृती सेननच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता हा वाद कपड्यांच्या फॅशनवरून हटून महिलांच्या स्वतंत्र निवडीचा आणि स्वातंत्र्याचा आदर करण्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊन पोहोचला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >