ठराविक माध्यमकर्मींना धनंजय मुंडे नावाचा कावीळ, त्यांना बीड जिल्ह्यात सलोखा नांदू द्यायचा नाही - मुंडेंची पुन्हा एकदा स्पष्टोक्ती
- मुख्यमंत्र्यांचा निर्णय; पहिल्या टप्प्यात ४ हजार कोटींचा निधी उभारणार मुंबई : राज्यातील वाढती पाणीटंचाई दूर करण्यासाठी आणि प्रदूषित नद्यांना ...
मुंबई : राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. सुनेत्रवहिनी अजितदादा पवार यांच्या वरती टीका करणाऱ्या विरोधकांना आ. धनंजय मुंडे यांनी आज मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधत उत्तर दिले. सुनेत्रा वहिनी अजित दादा पवार यांच्यावरती टीका करून एका महिला उपमुख्यमंत्र्याबद्दल काँग्रेसला किती द्वेष आहे हे काँग्रेसने दाखवून दिले आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.
स्वर्गीय अजित दादांच्या अकाली निधनानंतर ओढवलेल्या दुःखाच्या प्रसंगातून स्वतःला सावरत सुनेत्रा वहिनींनी अजितदादांची जागा घेतली आणि महाराष्ट्रातील मायबाप जनतेच्या प्रति स्वर्गीय अजित दादांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय उराशी बाळगून त्या दिवस रात्र काम करू लागल्या; त्यांच्यावर अशा प्रकारची टीका करण्यापूर्वी काँग्रेसने आपला इतिहास तपासायला हवा होता.
देशाच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनाही तत्कालीन विरोधकांनी 'गुंगी गुडिया' म्हणून हिणवले होते, मात्र त्यांनी आपल्या कर्तृत्वातून स्वतःला सिद्ध केले. त्याचप्रमाणे किंबहुना त्याहीपेक्षा पुढे जाऊन आदरणीय सुनेत्रा वहिनी आगामी काळामध्ये जनतेच्या व्यापक हिताचे काम करतील, असा आम्हाला विश्वास आहे, असेही ते पुढे बोलताना म्हणाले.
चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणात मंगळवारी सकाळी एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक घडामोडी समोर आली. अभिनेत्री तृषा (Trisha) हिच्यावर जाहीर सभेत अश्लील व ...
दरम्यान बीड जिल्हा दौऱ्यातील मीडिया ट्रायल संदर्भात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, खरे तर दोन दिवसाच्या बीड जिल्हा दौऱ्यावर आदरणीय सुनेत्रा वहिनी आल्या, तेव्हा पहिल्या दिवशी सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत सतत बैठका आणि जनतेची कामे करत होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वर्गीय अजितदादांप्रमाणे सकाळी सात वाजल्यापासून त्या शासकीय कामकाज आणि बैठकांमध्ये होत्या.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान सर्व माध्यम प्रतिनिधींना प्रशासनाच्या वतीने पत्र देऊन जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी संदर्भात सुनेत्रा वहिनी निवेदन करणारा असून पत्रकार परिषद नाही, असे स्पष्ट लेखी पत्र देण्यात आलेले होते, ते पत्रही श्री मुंडे यांनी माध्यमांना दाखवले.
स्वर्गीय अजित दादांच्या माघारी प्रथमच बीड जिल्ह्यात आलेल्या वहिनींना काही ठराविक प्रतिनिधींनी प्रश्न विचारायला सुरुवात केल्यानंतर मी ही पत्रकार परिषद नसल्याचे सांगितले, मात्र त्याचा विपर्यास करण्यात आला आणि त्यावरून काँग्रेस टीका करत आहे हे केविलवाणे आहे. त्याचबरोबर जनता संवाद दरम्यान काही लोक एकाच वेळी मोठमोठ्याने बोलत असल्याने त्यांना हळू बोला व शांतपणे आपले म्हणणे मांडा, असे सांगितले मात्र त्याचाही विपर्यास मी शेतकऱ्यांना दम दिला, असा केला गेला, हे खेडजनक आहे, असेही ते म्हणाले.
कोल्हापूर : लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणातून प्रगतीचा राजमार्ग खुला करणारे, समाजसेवेचे ध्यास घेतलेले... शिक्षण महर्षी म्हणून ओळखले जाणारे पद्मश्री डॉ. ...
मी दोन दिवसांपूर्वीच बीड मधील माध्यमकर्मीच्या संदर्भात एक ट्विट करत सांगितले होते की 95 टक्के पेक्षा अधिक पत्रकार हे अत्यंत सुज्ञ असून खूप चांगले काम करतात, आम्हाला त्यांचा आदर आहे, मात्र काही ठराविक पत्रकारांना जिल्ह्यातले वातावरण बिघडवायचे आहे. जिल्ह्यात सुलोख्याचे वातावरण होऊ नये यासाठी ते सातत्याने ते प्रयत्नशील असतात, त्याचा माझ्यासह अनेकांना फटका बसलेला आहे.
सततची मीडिया ट्रायल आणि खोट्या बातम्यांनी मी अक्षरशः वैतागून गेलो आहे. मागील अनेक दिवसांपासून माध्यमांवर बोलणे देखील टाळतो आहे. मात्र सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये केलेल्या भाषणांतून देखील माझ्या शब्दांचा विपर्यास करून माझ्या बदनामीची संधी शोधण्यात काहीजण धन्यता मानत आहेत, एका माणसाने सहन तरी किती करावे? मी खूप लहान माणूस आहे, माझी एवढी काय भीती आहे तुम्हाला? असा उद्विग्न प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
NEET प्रकरणात विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राजकीय संधी शोधणाऱ्या काँग्रेसने झारखंड मध्ये झालेल्या पेपरफुटीवर एखादे आंदोलन करावे; मात्र त्यावर ते तसूभरही बोलणार नाहीत. काँग्रेसने सुनेत्रा वहिनींचा द्वेष करण्यापेक्षा राज्यात आपली जी वाताहत झाली आहे, त्यावर आता लक्ष केंद्रित करावे! असा टोलाही श्री मुंडे यांनी लगावला.
मुंबई : भारतासह जगातील अनेक देशांतील काही WhatsApp वापरकर्त्यांना अचानक मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता अनेकांची ...
माझ्यावर विरोधकांनी मागील काळात अनेक आरोप केले, अगदी उच्च न्यायालयात गेले मात्र न्याय देवतेने माझ्या बाजूने निकाल दिला आणि याचिकाकर्त्यांना दंड लावला, तोंडघशी पडले. मात्र माध्यमे त्या खोटे आरोप करणाऱ्यांना एक प्रश्न विचारत नाहीत, असे का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
राजकीय भूमिकांवर टीका जरूर करावी मात्र माझ्या मातीची बदनामी आता सहन करणार नाही, असेही ते शेवटी म्हणाले.






