Ahilyanagar Crime : अहिल्यानगरमधून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. रविवारी पहाटे एका तळीराम गुंडाने माणुसकीची हद्द पार केल्याचा धक्कादायक प्रकार कळंब ते पिंपरी-चिंचवड बसमध्ये करंजी शिवारात समोर आला आहे. मद्यधुंद असलेल्या एका प्रवाशाने बसमधील एका दिव्यांग महिलेच्या अंगावर लघुशंका करत तिला दमदाटी देखील केली. या घटेनमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने तातडीने डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी बस थांबवून संबंधित गुंडाला खाली उतरवून चांगलाच चोप दिला. बसमध्ये एका दिव्यांग महिलेसोबत असा प्रकार घडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. (Ahilyanagar Crime News)
Ahilyanagar : देशभरात श्रावण महिन्यानिमित्त उत्साहाचे वातावरण आहे. शिवमंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करत आहे.अनेक ठिकाणी श्रवणानिमित्त उत्सव आणि ...
नेमकं काय घडलं ?
धाराशिव जिल्ह्यातील कळंब- पाथरी ते पिंपरी-चिंचवड बस शनिवारी पाथर्डी अहिल्यानगरमार्गे पुण्याला निघाली होती. बसमधून दिव्यांग महिला व त्यांची मुलगी प्रवास करत हाेती. यावेळी उमापूर येथून सुमारे २६ वर्षांचा तरुण बसमध्ये बसला. बस पाथर्डी करंजीमार्गे अहिल्यानगरकडे येत होती. तळीराम गुंड बसमध्ये बसला तेव्हा त्याचा तोल जात होता. तो बसमधील दोन्ही सिटांच्या मध्यभागी असलेल्या जागेत झोपला. धावत्या बसमध्येच तो अचानक उठला आणि त्याने महिलेच्या अंगावर लघुशंका केली. प्रवाशांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. (Ahilyanagar Crime News)
Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. साक्री तालुक्यातील रायपूर येथे फोन करून तरुणीचे ठरलेले लग्न मोडण्याचा प्रयत्न ...
मित्रांना बोलावून प्रवाशांवर दमदाटी
घडलेल्या घटनेमुळे महिलेने त्याला जाब विचारला असता त्याने उलट तिलाच दमदाटी केल्याचे समोर आले. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने तातडीने 'डायल ११२' वर संपर्क साधून पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पाथर्डी पोलिस ठाण्याचे (Pathardi Police Station) कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि बस थांबवून संबंधित गुंडाला खाली उतरवून पोलिसांनी चांगलाच चोप दिल. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. धक्कादायक म्हणजे तळीरामानेही त्याच्या काही मित्रांना बोलावून घेत प्रवाशांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी वेळीच येऊन त्याला खाली उतरवित बस पुढे नेण्यास सांगितले. बसमधील तळीराम हा बीड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.






