Nashik : आदिवासी विकास विभागांतर्गत (Department of Tribal Development) कार्यरत शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलद्वारे मोठी शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यातील नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर या चार विभागांतील शासकीय आश्रमशाळांमध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांची एकूण २ हजार ४२१ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. आदिवासी विकास विभागाच्या उपायुक्त शशिकला अहिरराव (Shashikala Ahirrao, Deputy Commissioner, Tribal Development Department) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्व काळात श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर बंद ठेवण्याचा कोणताही निर्णय झालेला नसून, मंदिर सुरूच राहणार आहे. ...
पेसातील ८८५, तर नॉन-पेसातील १ हजार ५३६ पदे
पेसा आणि नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदांचा या भरतीमध्ये समावेश करण्यात आला आहे. पेसा क्षेत्रातील ८८५, तर नॉन-पेसा क्षेत्रातील १ हजार ५३६ पदे भरण्यात येणार आहेत. प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक स्तरावरील मराठी आणि इंग्रजी माध्यमातील शिक्षकांची पदे यामध्ये समाविष्ट आहेत. उच्च माध्यमिक स्तरावर मराठी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांच्या शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत.
Nashik News : पवित्र श्रावण महिन्यानिमित्त नाशिकच्या प्रसिद्ध श्री कपालेश्वर महादेव मंदिरात (Kapaleshwar Temple) भाविकांनी दर्शनासाठी गर्दीच गर्दी केल्याचं पहायला ...
पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया
विभागनिहाय नाशिक विभागात ८२६, ठाणे विभागात ६१३, अमरावती विभागात ४६८ आणि नागपूर विभागात ५१४ पदे भरण्यात येणार आहेत. स्थानिक तसेच आदिवासी क्षेत्रातील उमेदवारांना न्याय मिळावा यासाठी पेसा आणि नॉन-पेसा क्षेत्रांचे स्पष्ट विभाजन करण्यात आले आहे. पवित्र पोर्टलद्वारे ही भरती प्रक्रिया पारदर्शक, गुणवत्ताधारित आणि नियमानुसार राबविण्यात येत आहे. उमेदवारांनी भरती प्रक्रियेबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड (Tribal Development Department Commissioner Leena Bansod) यांनी केले आहे.






