Friendship Day 2026 : फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिन कधी साजरा करतात आणि का ?

दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी जगातील बहुसंख्य देश फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिन साजरा करतात. यंदा ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार २ ऑगस्ट २०२६ रोजी आहे. यामुळे यंदा फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिन (Friendship Day 2026) रविवार २ ऑगस्ट २०२६ रोजी साजरा केला जाईल. फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिनाच्या निमित्ताने मित्रपरिवारामध्ये शुभेच्छापत्रे, भेटवस्तूंची, देवाणघेवाण होते.


आयुष्यात एक खरा मित्र असणे हे सुद्धा एका अनमोल भेटीपेक्षा कमी नाही. मित्र तेच असतात जे आनंदात तुमच्यासोबत हसतात आणि कठीण काळात तुम्हाला आधार देतात. ही नाती रक्ताची नसतात पण खूप जास्त खास असतात. हे विशेष नाते साजरे करण्यासाठी दरवर्षी फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिन साजरा केला जातो. या निमित्ताने, माणसं एकमेकांना भेटतात किवा फ्रेंडशिप बँड्स, भेटवस्तू आणि शुभेच्छा संदेश पाठवून आपल्या मित्रांना विशेष वाटावे यासाठी प्रयत्न करतात.


यावर्षी फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिन कधी साजरा केला जाईल ?


भारतासह जगातील अनेक देशांमध्ये यंदा फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिन (Friendship Day 2026) रविवार २ ऑगस्ट २०२६ रोजी साजरा केला जाईल.



फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिनाचे वैशिष्ट्य काय ?


फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिन आपल्याला आपल्या सुख-दु:खात आधार देणाऱ्या व्यक्तींचे आभार व्यक्त करण्याची संधी देतो. यामुळे मैत्रीचे नाते अधिक घट्ट होते.


तुमच्या मित्र परिवाराला खुश करण्यासाठी हे संदेश त्यांना पाठवा :


मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, तुझी मैत्री माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर संपत्ती आहे.
तू माझ्यासोबत असल्यामुळे प्रत्येक आठवण सुंदर आहे.
खरे मित्र आयुष्य आनंदाने भरून टाकतात… मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
तू माझ्यासोबत असल्यामुळे प्रत्येक आठवण सुंदर आहे.




फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिनानिमित्त Caption Ideas :


नातं रक्ताचं नसलं तरी, आयुष्यातील सर्वात अनमोल ठेवा म्हणजे मैत्री!
सुखात सोबत आणि संकटात आधार म्हणजे माझी मित्रमंडळी.
जर आयुष्य एक पुस्तक असेल, तर मैत्री हे त्यातील सर्वात सुंदर पान आहे.
माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे मैत्री.


फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिनाचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का ?


फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिन साजरा करण्याची सुरुवात १९५८ मध्ये पॅराग्वेच्या 'वर्ल्ड फ्रेंडशिप क्रुसेड' या संस्थेने केली. नंतर, २०११ मध्ये, संयुक्त राष्ट्र महासभेने ३० जुलै हा 'आंतरराष्ट्रीय मैत्री दिन' (International Friendship Day)  म्हणून घोषित केला. तथापि, भारत(India) आणि इतर अनेक देशांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा करण्याची परंपरा अजूनही कायम आहे.

Comments
Add Comment

26/11 Mumbai Attack Hafiz Saeed : हाफिज सईदसह ६ पाकिस्तानी आरोपींवर भारतात ‘इन-अबसेंटिया’ खटला; कायदेशीर प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली : २००८ च्या मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याला जवळपास १८ वर्षे उलटून गेल्यानंतर भारताने या

Police Dog Retirement : राज्य सरकारचा निर्णय! 10 वर्षे सेवा केल्यानंतरही पोलीस श्वान पोलिसांसोबतच राहणार

मुंबई : पोलीस दलात तब्बल 10 वर्षे सेवा बजावणाऱ्या श्वानांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत मुख्यमंत्री

IND vs SL 2nd Test : कुलदीप यादवला डच्चू? एका खेळाडूचे पदार्पण; श्रीलंकेविरुद्ध अशी असू शकते टीम इंडियाची Playing XI

IND vs SL 2nd Test : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने १६५ धावांनी शानदार विजय मिळवत दोन सामन्यांच्या

Gold Silver Price Hike : सोन्या-चांदीच्या भावात तुफान तेजी! आजच खरेदी करणार असाल तर थांबा; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अमेरिकन डॉलर आणि बॉंड यील्डमध्ये

Jantar Mantar Student Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील हिंसाचाराची होणार चौकशी; सुप्रीम कोर्टाकडून ५ सदस्यीय उच्चस्तरीय समितीची स्थापना

नवी दिल्ली : जंतरमंतरसह देशातील विविध ठिकाणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान हिंसाचार आणि

Vile Parle Crime News : मेसेज करून भेटायला बोलावलं; हात पकडला आणि ...; १६ वर्षीय मुलीच्या तक्रारीनंतर शिक्षकाला अटक

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले पूर्व परिसरात १६ वर्षीय शाळकरी मुलीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून ४७ वर्षीय