Ashok Kharat News : अशोक खरातला 'इतक्या' दिवसांची पोलीस कोठडी

Ashok Kharat News : नाशिकच्या बहुचर्चित अशोक खरात प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. समता पतसंस्थेतील शंभर बनावट खात्यांच्या गाजलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात (Ashok Kharat) याला नाशिक एसआयटीने पुन्हा ताब्यात घेत शुक्रवारी शिर्डी पोलिसांच्या (Shirdi Police) स्वाधीन केले आहे. यापूर्वी शिर्डीतील जमीन खरेदी प्रकरणात झालेल्या चौकशीत अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते. त्यातूनच समता पतसंस्थेतील कथित कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आणि शंभर बनावट खात्यांचा मोठा घोटाळा उघडकीस आला होता. (Ashok Kharat News )



अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात


शिर्डीतील जमीन प्रकरणातील (Shirdi land case) चौकशी पूर्ण झाल्यानंतर अशोक खरातला पुन्हा नाशिक एसआयटीच्या (Nashik SIT) ताब्यात देण्यात आले होते. त्यानंतर समता पतसंस्थेतील 100 बनावट खातेप्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीने त्याचा ताबा घेतला असून शुक्रवारी रात्री त्याला नाशिकहून शिर्डी पोलीस ठाण्यात (Shirdi Police Station) आणण्यात आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून राहाता ग्रामीण रुग्णालयात (Rahata Rural Hospital) त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. (Ashok Kharat News )



खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी


दरम्यान, शनिवारी दुपारी अशोक खरातला राहाता न्यायालयात (Rahata Court) हजर करण्यात आले होते. राहाता न्यायालयाने अशोक खरातला 7  दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एसआयटीचे अधिकारी तथा शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती करीत आहेत.

Comments
Add Comment

Nashik : सिन्नर-नाशिक महामार्गावरील L&T फाट्यावर कंटेनर पलटी, वाहतुकीवर परिणाम

Nashik : सिन्नर-नाशिक महामार्गावर (Sinnar-Nashik Highway) एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी असलेल्या L&T फाटा येथे आज भलामोठा कंटेनर वळण घेत

Nashik : अवघ्या काही तासांत पिंपळगाव कडवा कॅनलजवळ पुन्हा दुसरा अपघात; सिन्नर तालुक्यात खळबळ

Nashik : सिन्नर तालुक्यातील पांचाळे–सोमठाणे रस्त्यावरील पिंपळगाव कडवा कॅनलजवळ आज पहाटे सुमारे ६ वाजता भीषण अपघात

Maharashtra Epstein Files Teaser : 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा टीझर रिलीज; खरात प्रकरणावर आधारित सिनेमाची उत्सुकता वाढली

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेत राहिलेल्या भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर आधारित

Pizza company gets fine : १० इंचाच्या ऐवजी मिळाला ७ इंचाचा पिझ्झा; ग्राहक आयोगाचा दणका, कंपनीला भरावा लागला मोठा दंड!

आजकाल ऑनलाइन जेवण मागवणे जितके सोपे झाले आहे, तितकेच त्यात फसवणुकीचे प्रकारही वाढले आह

Nashik : सिन्नर तालुक्यातील पिंपळगाव कडवा कॅनलजवळ भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू

Nashik : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. पांचाळे–सोमठाणे रस्त्यावर पिंपळगाव कडवा

Kareena Kapoor Pregnancy : करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? नणंद सबा पटौदीने अखेर मौन सोडलं

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या कथित तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर