मुंबई : मुंबईतील विलेपार्ले पूर्व परिसरात १६ वर्षीय शाळकरी मुलीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून ४७ वर्षीय शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गणेश देवळूखकर असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Vile Parle Crime News)
WhatsAppवरून मेसेज करून भेटीसाठी बोलावले :
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक आणि पीडित मुलगी एकमेकांच्या परिचयाचे आहेत. आरोपीने मुलीला WhatsAppवरून मेसेज करत भेटण्यासाठी बोलावल्याचा आरोप आहे. मुलगी भेटण्यासाठी गेल्यानंतर आरोपीने तिचा हात पकडून तिला मागून ओढले. त्यानंतर तिच्याशी जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला आणि गैरवर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. (Vile Parle Crime News)
नवी दिल्ली, दि. २२ : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देत शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम ...
मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई :
घटनेनंतर पीडित मुलीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात BNS कलम ७५(३) तसेच इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी आरोपीला नोटीस बजावून ताब्यात घेतले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांकडून संबंधित व्यक्तींचे जबाब आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. (Vile Parle Crime News)
मुंबई : मुंबईतील विलेपार्ले पश्चिम परिसरात हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिठीबाई कॉलेजजवळील एन. एस. रोड क्रमांक 1 येथे रस्ता ओलांडणाऱ्या 15 ...
POCSO अंतर्गत प्रकरणाची चौकशी :
पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने या प्रकरणात POCSO कायद्याच्या तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणापासून संरक्षणासाठी POCSO कायद्यात कठोर तरतुदी आहेत. दरम्यान, पीडित मुलीची ओळख कायद्यानुसार गोपनीय ठेवण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, तपासातून पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत. (Vile Parle Crime News)