Iran - America War : इराणविरोधात ट्रम्प यांचा मोठा डाव? अमेरिकन लष्कराला नव्या कारवाईचे आदेश; मध्यपूर्वेत पुन्हा तणाव वाढला

वॉशिंग्टन : अमेरिका (America)आणि इराण (Iran) यांच्यातील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी लष्कराला इराणविरोधात मोठ्या लष्करी कारवाईची तयारी करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या संभाव्य कारवाईचा उद्देश इराणवर दबाव वाढवून तेहरानला चर्चेच्या टेबलावर आणणे हा आहे. (Iran - America War)



'आम्ही जोरदार कारवाई करू' – डोनाल्ड ट्रम्प


मॅरिलँडमधील कॅम्प डेव्हिड येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बोलताना ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला थेट इशारा दिला. "आम्ही अत्यंत जोरदार कारवाई करू. अशी वेळ येईल की इराणलाच हे पुढे सहन करणे शक्य होणार नाही," असे ते म्हणाले. वृत्तानुसार, अमेरिकेकडून इराणमधील वीज निर्मिती केंद्रे आणि पेट्रोलियम रिफायनऱ्यांसारख्या महत्त्वाच्या ऊर्जा सुविधांवर लक्ष्य साधण्याचा विचार सुरू आहे. जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अधिक आक्रमक भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. (Iran - America War)



मानवाधिकार संघटनांची चिंता :


या संभाव्य कारवाईवर मानवाधिकार संघटनांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. नागरी वापरातील पायाभूत सुविधा लक्ष्य करणे हे आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे उल्लंघन ठरू शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेव्हिट यांनी स्पष्ट केले की, "इराणने अमेरिकेला मान्य होईल अशा अटींवर चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही, तर त्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल." (Iran - America War)



तेल बाजारावरही परिणाम :


या घडामोडींमुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. संभाव्य संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट (WTI) कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल ८६ अमेरिकन डॉलरच्या पुढे गेल्याचे वृत्त आहे. (Iran - America War)



यापूर्वीही अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला होता. या परिस्थितीचा परिणाम होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक, कच्च्या तेलाचा पुरवठा, नैसर्गिक वायू आणि खतांच्या जागतिक पुरवठा साखळीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या संभाव्य लष्करी कारवाईबाबत अमेरिकेकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत अमेरिका-इराण संबंध कोणते वळण घेतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. (Iran - America War)

Comments
Add Comment

US vs Canada Trade War Update : कॅनडाचा थेट ट्रम्प यांना इशारा! अमेरिकेला 'जशास तसे' उत्तर; व्यापार चर्चा ठरली निष्फळ!

वॉशिंग्टन : अमेरिका (America) आणि कॅनडा (Canada) यांच्यातील तीन दिवसांपासून सुरू असलेली महत्त्वाची व्यापार चर्चा अखेर

California Assembly : कॅलिफोर्निया असेंब्लीचा ऐतिहासिक निर्णय; ८ नोव्हेंबरला ‘दिवाळी डे’ साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर

कॅलिफोर्निया : अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्टेट असेंब्लीने गुरुवारी एक ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर करत यंदा रविवार, ८

Canada Gurdwara Attack : कॅनडातील गुरुद्वारात चाकू हल्ला; दोन जण जखमी, 27 वर्षीय तरुणाला अटक

कॅनडा : कॅनडातील एडमंटन येथील नानकसर गुरुद्वारात शुक्रवारी पहाटे चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. या

Pirates kidnap Indians : सागरी चाच्यांचा धुमाकूळ, २२ भारतीयांसह ३० जणांचे अपहरण; येमेन आणि सोमालियाच्या समुद्रातील धक्कादायक घटना

येमेन : येमेन आणि सोमालियाच्या किनाऱ्याजवळ घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सागरी चाच्यांनी दोन व्यावसायिक

China Visa : भारतीयांना व्यावसायिक कामांसाठी चीनला जाणे झाले कठीण

बीजिंग : चीनने भारतीयांसाठी व्यावसायिक व्हिसाच्या नियमांमध्ये बदल के

Imran Khan : इम्रान खान यांना रात्री रुग्णालयात हलवले; वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा तुरुंगात पाठवले

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे संस्थापक इम्रान खान यांना रात्री कडक