IND vs SL 2nd Test : कुलदीप यादवला डच्चू? एका खेळाडूचे पदार्पण; श्रीलंकेविरुद्ध अशी असू शकते टीम इंडियाची Playing XI

IND vs SL 2nd Test : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने १६५ धावांनी शानदार विजय मिळवत दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या कसोटीतही विजय मिळवून मालिका २-० अशी खिशात घालण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य असेल. (IND vs SL 2nd Test)


कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या कसोटीत फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत प्रभावी कामगिरी केली. विशेषतः मानव सुथारने दोन्ही डावांत मिळून १० विकेट्स घेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग-११ निवडताना संघ व्यवस्थापनासमोर काही महत्त्वाचे निर्णय असणार आहेत. (IND vs SL 2nd Test)



कुलदीप यादवच्या जागी सारांश जैनला संधी?


दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात सर्वात मोठा बदल गोलंदाजी विभागात होण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटीत कुलदीप यादवला फारशी गोलंदाजी मिळाली नव्हती. कर्णधार शुभमन गिलने त्याच्याकडून केवळ २५ षटके गोलंदाजी करून घेतली.


दुसरीकडे मानव सुथारने आपल्या फिरकीने श्रीलंकेच्या फलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले, तर रवींद्र जडेजानेही मोठ्या प्रमाणात गोलंदाजी केली. त्यामुळे कुलदीप यादवच्या जागी मध्य प्रदेशचा अष्टपैलू खेळाडू सारांश जैन याला कसोटी पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ३३ वर्षीय सारांश जैन उजव्या हाताने फलंदाजी करण्यासोबतच ऑफ-स्पिन गोलंदाजी करतो. श्रीलंकेच्या फिरकीला अनुकूल परिस्थितीत ऑफ-स्पिनचा पर्याय भारतासाठी उपयुक्त ठरू शकतो. (IND vs SL 2nd Test)



ध्रुव जुरेलमुळे सरफराजला पुन्हा प्रतीक्षा :


फलंदाजीच्या क्रमात मोठा बदल होण्याची शक्यता मात्र कमी आहे. पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलने पहिल्या डावात शानदार अर्धशतक झळकावत आपली उपयुक्तता सिद्ध केली. त्यामुळे यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून त्याचे स्थान आणखी मजबूत झाले आहे. यामुळे संघात स्थान मिळवण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सरफराज खानला आणखी काही काळ बाकावर बसावे लागू शकते. ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल हे दोन यष्टीरक्षक-फलंदाज उपलब्ध असल्याने भारतीय संघाकडे आधीच चांगले पर्याय आहेत. (IND vs SL 2nd Test)



टॉप ऑर्डरमध्ये बदलाची शक्यता कमी :


भारताच्या टॉप ऑर्डरमध्येही सध्याचे संयोजन कायम राहण्याची शक्यता आहे. यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार शुभमन गिल यांनी पहिल्या कसोटीत संघाला चांगली सुरुवात आणि भक्कम आधार दिला. विशेषतः देवदत्त पडिक्कलने शानदार फलंदाजी करत सामनावीराचा पुरस्कार मिळवला. त्यामुळे त्याला दुसऱ्या कसोटीतून वगळण्याची शक्यता कमी आहे. (IND vs SL 2nd Test)



सिराज-प्रसिद्ध कृष्णाची जोडी कायम?


वेगवान गोलंदाजी विभागात मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांची जोडी कायम राहण्याची शक्यता आहे. गुरनूर ब्रारच्या समावेशाची चर्चा असली तरी दुसऱ्या कसोटीत त्याला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता तुलनेने कमी आहे. पहिल्या कसोटीत विजय मिळवून देणाऱ्या संयोजनात फार मोठे बदल न करता, केवळ परिस्थितीनुसार एक-दोन बदल करण्याकडे टीम मॅनेजमेंटचा कल असू शकतो. (IND vs SL 2nd Test)



श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी संभाव्य Playing XI :


यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, सारांश जैन, मानव सुथार, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज. (IND vs SL 2nd Test)

Comments
Add Comment

Women's Hockey World Cup : भारतीय महिला हॉकी संघाचा नेदरलँड्सकडून पराभव, उपांत्य फेरीच्या आशांना धक्का

ॲमस्टेलवीन : महिला हॉकी विश्वचषकाच्या दुसऱ्या फेरीत, भारतीय महिला हॉकी संघाला गतविजेत्या ऑलिम्पिक आणि

Mitchell Starc : मिचेल स्टार्कचा बांगलादेशवर कहर; अवघ्या २२ चेंडूत अर्धी टीम गारद, डेल स्टेनलाही टाकलं मागे

Aus vs Ban 2nd Test Match : ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना मॅके येथे खेळवला जात आहे. पहिल्या

Neeraj Chopra : लुसाने डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचा सीझनमधील सर्वोत्तम थ्रो; अवघ्या ९ सेंटीमीटरने हुकलं सुवर्णपदक

नवी मुंबई : भारताचा स्टार भालाफेकपटू आणि ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने लुसाने डायमंड लीगमध्ये (Lausanne Diamond League)

Sunetra Pawar : खो-खो असोसिएशन होणार पेपरलेस, २३ जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉप; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घोषणा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत खो खो असोसिएशन बैठक पार खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार

Shivpal Singh : भालाफेकपटू शिवपाल सिंगवर १० वर्षांची बंदी

नवी दिल्ली : टोकियो २०२० ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा ३१ वर्षीय भालाफेकपटू शिवपाल सिंग याच्यावर

Hockey World Cup : उपांत्य फेरीच्या मार्गात भारतासमोर नेदरलँड्सचे कडवे आव्हान

अम्स्टेलवीन : एफआयएच हॉकी विश्वचषक बेल्जियम-नेदरलँड्स 2026 च्या दुसऱ्या टप्प्यात भारतीय पुरुष आणि महिला संघांसमोर