Simhastha Kumbh Mela 2027 : २७ हजार कोटींच्या कुंभ अर्थव्यवस्थेचा लाभ स्थानिकांना मिळावा; कुंभमेळा प्राधिकरण, देआसराच्या ‘अनेक’ उपक्रमाचा पुढील टप्पा सुरू

Simhastha Kumbh Mela 2027 : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या कामांना वेग आला आहे. नाशिक मध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यात सुमारे २७ हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होण्याचा अंदाज आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या आर्थिक संधीचा लाभ महिला बचत गट, पथविक्रेते आणि स्थानिक सूक्ष्म उद्योजकांना मिळावा, यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आणि देआसरा फाउंडेशन यांनी संयुक्तपणे राबविलेल्या ‘अनेक’ (ANEK: Accelerating Nano Enterprises through Kumbh) उपक्रमाच्या पुढील टप्प्याला प्रारंभ केला आहे. या अंतर्गत उमेद (UMED) आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM) अंतर्गत लाभार्थ्यांसाठी क्षमता विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. (Simhastha Kumbh Mela 2027)



२७ हजार कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित


यापूर्वी कुंभमेळा प्राधिकरण आणि देआसरा फाउंडेशन यांच्या सहकार्याने करण्यात आलेल्या अभ्यासात सिंहस्थ कुंभमेळा २०२७ मुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आर्थिक व्यवहारांद्वारे सुमारे २७ हजार कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या आर्थिक प्रवाहात स्थानिक उद्योजकांचा अधिकाधिक सहभाग वाढावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमाअंतर्गत ४ ऑगस्ट रोजी उमेदमधील महिला बचत गटांसाठी, तर ५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातील पथविक्रेते आणि महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. या सत्रांमध्ये कुंभमेळ्यातील व्यवसायाच्या संधी, व्यवसायासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर आणि आर्थिक साक्षरता याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. (Simhastha Kumbh Mela 2027)



आर्थिक संधींचा लाभ स्थानिकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे


कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यावेळी म्हणाले, "सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक संधींचा लाभ स्थानिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. महिला बचत गट, पथविक्रेते आणि सूक्ष्म उद्योजकांना सक्षम करून त्यांचा या अर्थचक्रात सक्रिय सहभाग वाढविण्यावर आमचा भर आहे. 'अनेक' उपक्रमातून स्थानिक उद्योजकांना दीर्घकालीन व्यवसाय संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. (Simhastha Kumbh Mela 2027)



नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यावेळी म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळा हा ग्रामीण भागातील महिला बचत गटांसाठी आणि सूक्ष्म उद्योजकांसाठी मोठी आर्थिक संधी आहे. 'उमेद' अभियानाच्या माध्यमातून महिला बचत गटांना आवश्यक कौशल्य, व्यवसायविषयक मार्गदर्शन आणि बाजारपेठेची तयारी करून देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे त्या कुंभमेळ्यात उपलब्ध होणाऱ्या व्यवसायाच्या संधींचा प्रभावीपणे लाभ घेऊन आपले उत्पन्न वाढवू शकतील. (Simhastha Kumbh Mela 2027)


देआसरा फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा गोडबोले म्हणाल्या, सिंहस्थपूर्व काळात स्थानिक उद्योजकांना आवश्यक प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि बाजारपेठेची तयारी करून दिल्यास ते कुंभमेळ्यादरम्यान उपलब्ध होणाऱ्या संधींचा अधिक प्रभावीपणे लाभ घेऊ शकतील. हा उपक्रम त्याच दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.

Comments
Add Comment

Rajmata Jijau Mahila Sashaktikaran Yojana : 'राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण' योजनेसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन; महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी

 शासकीय पड जमिनींवर चारा व बांबू उत्पादनाला वेग मिळणार ‘राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजने’च्या प्रभावी

Jalgaon Rain Update : तापी नदीला पूर ! ‘हतनूर’ धरणाचे सर्व ४१ दरवाजे उघडले; जिल्ह्यात पावसाचा कहर

Jalgaon Rain Update : जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या (Hatnur Dam) पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक

CRIME : डोंबिवली हादरली! कामाची आणि निवाऱ्याची सोय करण्याचे आमिष दाखवून १६ वर्षीय हतबल मुलीवर सामूहिक अत्याचार; मुख्य आरोपीसह तिघे अटकेत

डोंबिवली: महाराष्ट्राच्या डोंबिवली शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.

Mirzapur The Movie : 'मिर्झापूर: द मूव्ही'चा देशभर भौकाल! ट्रेलरनंतर 7-8 शहरांमध्ये मेगा प्रमोशन; चाहत्यांच्या भेटीला पोहोचणार स्टारकास्ट

 Mirzapur The Movie : अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर 'मिर्झापूर: द मूव्ही'चा दमदार टीझर प्रदर्शित झाला असून, आता

Nashik Kumbh Mela : सिंहस्थासाठी तांत्रिक सज्जतेचा आढावा; तांत्रिक सल्लागार समितीकडून नाशिकमधील कुंभस्थळांची पाहणी

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ (Simhastha Kumbh Mela 2027) दरम्यान गर्दी व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, सुरक्षा, संप्रेषण

Kirit Somaiya : ४० लाख बांग्लादेशींनी खोट्या कागदपत्रांआधारे भरले 'एसआयआर' फॉर्म; किरीट सोमय्यांचा दावा

मशिदींमधून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप https://prahaar.in/2026/07/31/nandurbar-rain-update-torrential-rain-wreaks-havoc-in-nandurbar-district/ मुंबई : विशेष