सचिन पिळगावकर यांनी सांगितला गौप्यस्फोट "मी म्हातारा होणार नाही..." संजीव कुमार यांच्या निधनामागचे आणि गूढ भविष्याचे रहस्य

मुंबई: बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार आणि अप्रतिम अभिनयाचा अमीट छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते संजीव कुमार (Sanjeev Kumar) यांचे नाव आजही चित्रपटसृष्टीत आदराने घेतले जाते. 'शोले', 'आंधी' आणि 'अंगूर' यांसारख्या अजरामर चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला, ज्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली होती. मात्र, संजीव कुमार आपल्या प्रत्यक्ष वयापेक्षा खूप मोठ्या असणाऱ्या भूमिका चित्रपटांमध्ये का साकारायचे, यामागचे एक गूढ आणि अंगावर काटा आणणारे कारण आता समोर आले आहे.



सचिन पिळगावकरांचा धक्कादायक खुलासा


प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांनी नुकताच एका मुलाखतीत संजीव कुमार यांच्याशी असलेल्या घट्ट मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी त्यांनी एक मोठा खुलासा केला. संजीव कुमार यांनी एका भविष्यकाराने वर्तवलेल्या भाकिताबद्दल सचिन यांना सांगितले होते. एका हस्तरेषा तज्ज्ञाने त्यांचे आयुष्य फार मोठे नाही आणि ते कधीच म्हातारपण पाहू शकणार नाहीत, अशी भविष्यवाणी वर्तवली होती.


याबाबत बोलताना संजीव कुमार यांनी सचिन यांना सांगितले होते की, "जे आयुष्य प्रत्यक्षात दीर्घकाळ जगायला मिळणार नाही, तो म्हातारपणाचा टप्पा कमीत कमी पडद्यावर तरी अनुभवावा." याच इच्छेपोटी ते आपल्या वयापेक्षा मोठ्या आणि प्रौढ व्यक्तींच्या भूमिका पडद्यावर साकारत असत.



निधनापूर्वीची ती अखेरची भेट


संजीव कुमार यांच्या निधनाच्या आदल्या दिवशी सचिन पिळगावकर एका डबिंग सेशनदरम्यान त्यांना भेटले होते. त्यावेळी संजीव कुमार यांनी त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी घरी बोलावले होते. मात्र, ठरल्याप्रमाणे सचिन दुपारी अडीच वाजता त्यांच्या घरी पोहोचले. तेव्हा ते बेडरूममधील बाथरुममध्ये असल्याचे त्यांना सांगण्यात आले. साधारण अर्धा तास वाट पाहिल्यानंतर सचिन यांना काहीतरी अनुचित घडल्याची शंका आली.


चौकशी केल्यानंतर समजले की, संजीव कुमार यांची प्रकृती अचानक खालावली असून डॉक्टरांना बोलावण्यात आले आहे. आदल्या रात्री ते पहाटे तीन ते चार वाजेपर्यंत शूटिंग करून घरी परतले होते आणि त्यांना उलट्याही झाल्या होत्या. प्रकृती ठीक नसतानाही ते इतका उशिरापर्यंत काम करत असल्यामुळे त्यांना ओरडणार असल्याचे सचिन यांनी मनात ठरवले होते, कारण संजीव कुमार हे त्यांचे मार्गदर्शक आणि मित्र होते.



अखेर भविष्य खरे ठरले


बेडरूमचा दरवाजा बंद होता आणि उपस्थित लोक आत जाण्यास घाबरत होते. अशात सचिन यांनी हिंमत करून दरवाजा उघडला. समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. संजीव कुमार बेडरूममधील कारपेटवर मृत अवस्थेत पडले होते. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. ६ नोव्हेंबर १९८५ रोजी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरवली होती. हस्तरेषा तज्ज्ञाने वर्तवलेले ते गूढ भाकीत अखेर सत्य ठरले.

Comments
Add Comment

Arjun Rampal : ८ वर्षांच्या सहवासानंतर अखेर जोडले बंध; अभिनेता अर्जुन रामपालने गोव्यात गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत उरकले लग्न!

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची दीर्घकाळाची जोडीदार गॅब्रिएला डेमेट्रियाडेस यांनी अखेर अधिकृतपणे

Taapsee Pannu : तापसी पन्नूच्या 'गांधारी' चित्रपटाची पहिली झलक समोर; टीझरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट 'गांधारी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन

Sandeep Vanga vs Deepika Padukone : दीपिका पादुकोणमुळे ‘स्पिरीट’ची कथा फुटली ? ५-६ कोटींचा वाद अन् १०% चा वाटा; वांगा बंधूंचा दीपिका पादुकोणवर सनसनाटी आरोप

मुंबई : दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांच्या आगामी ‘स्पिरीट’ (Spirit Movie) या बहुचर्चित चित्रपटाभोवतीचा वाद

Vanita Kharat : सावध राहा! ऑनलाईन पार्सलच्या जाळ्यात अडकली वनिता खरात; अभिनेत्रीनेच उघड केली भामट्यांची नवी शक्कल!

मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरातसोबत पार्सलच्या नावाने ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार

Akshaye Khanna : धुरंधरचा 'रहमान डकैत' आता गुरु शुक्राचार्यांच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना त्याच्या नवनवीन आणि आव्हानात्मक भूमिकांसाठी चर्चेत आला. 'छावा'मधील 'औरंगजेब'

Sonu Nigam : "ते १२ रुपये फ्रेम करून मी आजही माझ्या ऑफिसमध्ये लावले आहेत", सोनू निगमने सांगितला जबरदस्त किस्सा

मुंबई : अनेक कलाकार बरेचदा आपल्या चाहत्यांचं प्रेम जाणून घेण्यासाठी वेशांतर करुन त्यांच्यात वावरतात. २०१६ मध्ये