Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह फिटनेस टेस्ट पास ; श्रीलंका मालिकेसाठी सज्ज

मुंबई : भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने फिटनेस चाचणी यशस्वीरीत्या पास केली आहे. भारतीय संघ आणि चाहत्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. बुमराह संघात असला की प्रतिस्पर्धी संघावर नेहमीच अतिरिक्त दबाव निर्माण होतो. त्यामुळे फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर तो कोणत्या मालिकेत भारतीय संघाकडून खेळताना दिसणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराहने फिटनेस टेस्ट यशस्वीरीत्या पार केली आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने लॉर्ड्स येथे खेळवण्यात आलेला मालिकेतील अखेरचा वनडे सामना गमावला होता. त्यानंतर तो पुनर्वसनासाठी (रिहॅब) बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दाखल झाला होता. आता त्याला बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळाले आहे. (Jasprit Bumrah)



भारतीय संघ 15 ऑगस्टपासून श्रीलंका दौऱ्यावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी 28 जुलै रोजी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. या संघात जसप्रीत बुमराहचाही समावेश करण्यात आला होता. मात्र, बीसीसीआयने त्याचा सहभाग फिटनेसवर अवलंबून असल्याचे स्पष्ट केले होते.आता बुमराहने फिटनेस चाचणी उत्तीर्ण केल्याने तो श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे. बुमराहने आपला शेवटचा कसोटी सामना नोव्हेंबर 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. जवळपास वर्षभरानंतर तो पुन्हा कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. या मालिकेत त्याची कामगिरी कशी राहते, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल.



श्रीलंका कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ :


शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर बरार, देवदत्त पडिक्कल आणि सारांश जैन.





भारत-श्रीलंका कसोटी मालिकेचे वेळापत्रक:
पहिली कसोटी: 15 ते 19 ऑगस्ट 2026 स्थळ : गाले आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गाले आणि दुसरी कसोटी: 23 ते 27 ऑगस्ट 2026 स्थळ : सिंहलीज स्पोर्ट्स क्लब, कोलंबो
Comments
Add Comment

Duleep Trophy : दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात येणार

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफी २०२६-२७ चा अंतिम सामना आता बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) ऐवजी चेन्नई येथील एम. ए.

Manu Bhaker : ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर महाकालच्या चरणी

उज्जैन : ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकरने मध्य प्रदेशातील उज्जैन येथील जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग भगवान

BWF World Championships : महिला आणि पुरुष एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात; पीव्ही सिंधू आणि आयुष शेट्टीला पराभवाचा धक्का

नवी दिल्ली : २०२६ च्या बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिपमध्ये २० ऑगस्ट हा भारतासाठी निराशाजनक दिवस ठरला. महिला एकेरी,

Hockey World Cup 2026 : हॉकी वर्ल्ड कप २०२६ मध्ये इंग्लंडला गोलशून्य बरोबरीत रोखत भारताची पुढील फेरीत वाटचाल

हॉकी वर्ल्ड कप २०२६ मध्ये गुरुवारी भारत आणि इंग्लंड महिला संघांमध्ये डी गटातील अखेरचा साखळी सामना रंगला. अत्यंत

Cricket Match-Fixing : कॅनडावरील मॅच फिक्सिंगच्या आरोपांनंतर मुख्य प्रशिक्षक मॉन्टी देसाईंचा राजीनामा

नवी दिल्ली : कॅनडाच्या पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मॉन्टी देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. १

Joe Root Test Stats : १३ धावा अन् महाविक्रम! जो रूट करणार सचिन तेंडुलकरची बरोबरी ?

पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) सुरू असलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट (Joe Root) एका ऐतिहासिक टप्प्यावर