Beed ACB Raid : बीडमध्ये 45 लाखांच्या लाचप्रकरणी विभागीय वन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; राहत्या घरी रंगेहात पकडलं

बीड : बीड (Beed) जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावार यांना 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यांच्या राहत्या घरी ही कारवाई करण्यात आली असून, या घटनेमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (Beed)


मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडल्यानंतर श्रीनिवास लखमावार आपल्या निवासस्थानी परतले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने पूर्वनियोजित सापळा रचून त्यांना लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. (Beed ACB Raid)



एसीबीच्या माहितीनुसार, सन 2025-26 मधील वृक्षलागवडीची बिले मंजूर करणे, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करणे आणि निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी श्रीनिवास लखमावार यांनी 45 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तक्रारदाराने 29 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर शुक्रवारी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.


एसीबीने जप्त केलेल्या रकमेपैकी 5 लाख रुपये खऱ्या नोटांच्या स्वरूपात होते, तर उर्वरित 40 लाख रुपये मनोरंजन बँकेच्या (डमी) नोटांच्या स्वरूपात होते. आरोपीने रक्कम स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले.


या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीच्या अधीक्षक माधुरी कांगणे तपासासाठी बीडमध्ये दाखल झाल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.


 
Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम! पुढील ३ दिवसांचा हवामान अंदाज जारी

राज्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या नव्या अंदाजानुसार आगामी तीन दिवस महाराष्ट्रातील

Four-year-old Aarohi :आईपासून दुरावलेली चार वर्षीय आरोही पोलिसांच्या प्रयत्नांनी सुखरूप घरी

लातूर : देवणी येथील आठवडी बाजारात आईपासून दुरावलेल्या अवघ्या चार वर्षीय आरोहीचा देवणी पोलिसांनी अवघ्या चार

Mumbai-Goa Highway : मुंबई - गोवा महामार्गावरील कार अपघातात एका महिलेचा मृत्यू, तिघेजण गंभीर जखमी

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप-पत्रादेवी बायपासवर इन्सुली येथे रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका कारचा भीषण

Pratap Sarnaik : व्यवहारिक मराठी न येणाऱ्या १,२६८ चालकांना नोटिस; महिनाभरात मराठी शिका, अन्यथा बॅज निलंबित

मुंबई : महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी

FDA Raid : पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३ हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने निलंबित तर १९.९० लाखांचे खाद्यपदार्थ जप्त!

पुणे : अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाने १७ ते २० ऑगस्ट दरम्यान पुणे, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली

Mumbai Local : किरकोळ वाद झाला अन् प्रवाशाला चक्क धावत्या ट्रेनमधून खाली ढकलून दिलं

मुंबई : चर्चगेट ते बोरिवली दरम्यान धावणाऱ्या एका लोकल ट्रेनमध्ये किरकोळ वादातून एका प्रवाशाला धावत्या डब्यातून