Hockey World Cup 2026 : हॉकी वर्ल्ड कप २०२६ मध्ये इंग्लंडला गोलशून्य बरोबरीत रोखत भारताची पुढील फेरीत वाटचाल

हॉकी वर्ल्ड कप २०२६ मध्ये गुरुवारी भारत आणि इंग्लंड महिला संघांमध्ये डी गटातील अखेरचा साखळी सामना रंगला. अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात भारताने इंग्लंडला ०-० असे गोलशून्य बरोबरीत रोखत पुढील फेरीत प्रवेश केला. भारतासाठी बरोबरी किंवा विजय पुरेसा होता, तर इंग्लंडला पुढे जाण्यासाठी विजय आवश्यक होता. या बरोबरीमुळे इंग्लंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. (Hockey World Cup 2026)


डी गटातून चीन आणि भारताने पुढील फेरी गाठली, तर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचा प्रवास संपला. भारताच्या गोलकिपर बिछू देवीने शानदार बचाव करत संघाच्या पुढील फेरीतील प्रवेशात महत्त्वाची भूमिका बजावली.


पहिल्या क्वार्टरमध्ये सामना चुरशीचा असल्याने दोन्ही संघांनी आक्रमक सुरुवात केली. चौथ्या मिनिटाला नवनीत कौरच्या पासवर इशिकाने गोलचा प्रयत्न केला, मात्र इंग्लंडची गोलकिपर प्रिचर्डने तो रोखला. भारताला सातव्या आणि इंग्लंडला दहाव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण दोन्ही संघांना गोल करण्यात यश आले नाही. पहिला क्वार्टर ०-० असा संपला. (Hockey World Cup 2026)


दुसऱ्या क्वार्टरमध्ये इंग्लंडने चेंडूवर अधिक ताबा ठेवला. २२ व्या मिनिटाला सलिमाचा प्रयत्न प्रिचर्डने रोखला. भारताला २६ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, मात्र त्याचाही फायदा झाला नाही. इंग्लंडच्या पेनल्टी कॉर्नरवरही भारताने प्रभावी बचाव केला. होवार्डला यलो कार्ड मिळाल्याने तिला पाच मिनिटे मैदानाबाहेर राहावे लागले. दुसरा क्वार्टरही गोलशून्य राहिला. (Hockey World Cup 2026)


पहिल्या हाफमध्ये भारताचा चेंडूवर ५० टक्क्यांहून अधिक ताबा होता. दोन्ही संघांना प्रत्येकी चार पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र मजबूत बचावामुळे एकही गोल झाला नाही.


तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने आक्रमक सुरुवात करत ३१ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला. प्रिचर्डने शानदार बचाव केला. सलीमाच्या रिबाऊंडवरील प्रयत्नानंतर भारताला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला, मात्र गोल झाला नाही. त्यानंतर इंग्लंडने सलग पेनल्टी कॉर्नर मिळवत दबाव वाढवला, पण भारतीय बचाव भेदण्यात त्यांना अपयश आले. (Hockey World Cup 2026)

Comments
Add Comment