IND vs BRA : भारतीय फुटबॉलसाठी ऐतिहासिक क्षण! पाच वेळच्या विश्वविजेत्यांचा सामना भारतात होणार; भारतीय चाहत्यांसाठी आंनदाची बाब

मुंबई : भारतीय फुटबॉलप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. फिफा वर्ल्ड कप २०२६ मध्ये राऊंड ऑफ १६ खेळणारा फुटबॉल संघ आता भारतीय संघाविरुद्ध सामना खेळण्यासाठी येणार आहे. जगातील सर्वात यशस्वी फुटबॉल संघ आणि पाच वेळा विश्वचषक जिंकणारा संघ ब्राझील पहिल्यांदाच भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. (IND vs BRA)



भारत आणि ब्राझील यांच्यातील आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामना ३ ऑक्टोबर २०२६ रोजी खेळला जाणार आहे. भारत आणि ब्राझील यांच्यातील हा सामना कोलकाता येथील विवेकानंद युवा भारतीय क्रीडांगण येथे खेळला जाणार आहे. ही माहिती ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने (AIFF) दिली.ब्राझील संघ सध्या फिफा जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे. तसेच ब्राझील फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. यामुळे भारतीय फुटबॉलसाठी हा सामना ऐतिहासिक ठरणार आहे.ब्राझीलसारख्या दिग्गज संघाचे भारतात आगमन होणे ही भारतीय फुटबॉलसाठी ऐतिहासिक बाब असल्याचे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे (AIFF) उप-सरचिटणीस एम. सत्यनारायण म्हणाले.(IND vs BRA)







भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाचे संचालक आणि माजी गोलकीपर सुब्रत पॉल यांनी या सामन्याचे वर्णन भारतीय खेळाडूंसाठी एक सुवर्णसंधी म्हणून केले आहे. या सामन्यामुळे त्यांना जगातील सर्वोत्तम संघांपैकी एकाविरुद्ध आपली क्षमता तपासण्याची आणि मौल्यवान अनुभव मिळवण्याची संधी मिळेल. ब्राझीलचा हा दौरा भारतीय फुटबॉलमधील एका ऐतिहासिक क्षणाच्या आठवणींना उजाळा देईल. याआधी १९७७ मध्ये, ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांनी न्यूयॉर्क कॉसमॉस क्लबचे प्रतिनिधित्व करताना भारताचा दौरा केला होता. त्यावेळी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर मोहन बागानविरुद्ध खेळलेला सामना २-२ अशा बरोबरीत सुटला होता. अलीकडच्या काळात ब्राझीलच्या काही क्लब्सनी भारताचा दौरा केला असला, तरी ब्राझीलच्या वरिष्ठ राष्ट्रीय संघाचा भारत दौरा अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक आहे.








भारतीय फुटबॉसाठी पुढचे काही माहिने ऐतिहासिक ठरणार आहेत. नोव्हेंबरमध्ये भारतीय फुटबॉल संघ न्यूझीलंडविरुद्ध दोन मैत्रीपूर्ण सामने खेळणार आहे. पहिला सामना १२ नोव्हेंबर रोजी ऑकलंडमध्ये, तर दुसरा सामना १५ नोव्हेंबर रोजी क्राइस्टचर्चमध्ये खेळवला जाणार आहे. यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे दोन महिने भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

Comments
Add Comment

Duleep Trophy : दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात येणार

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफी २०२६-२७ चा अंतिम सामना आता बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) ऐवजी चेन्नई येथील एम. ए.

Manu Bhaker : ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर महाकालच्या चरणी

उज्जैन : ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकरने मध्य प्रदेशातील उज्जैन येथील जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग भगवान

BWF World Championships : महिला आणि पुरुष एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात; पीव्ही सिंधू आणि आयुष शेट्टीला पराभवाचा धक्का

नवी दिल्ली : २०२६ च्या बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिपमध्ये २० ऑगस्ट हा भारतासाठी निराशाजनक दिवस ठरला. महिला एकेरी,

Hockey World Cup 2026 : हॉकी वर्ल्ड कप २०२६ मध्ये इंग्लंडला गोलशून्य बरोबरीत रोखत भारताची पुढील फेरीत वाटचाल

हॉकी वर्ल्ड कप २०२६ मध्ये गुरुवारी भारत आणि इंग्लंड महिला संघांमध्ये डी गटातील अखेरचा साखळी सामना रंगला. अत्यंत

Cricket Match-Fixing : कॅनडावरील मॅच फिक्सिंगच्या आरोपांनंतर मुख्य प्रशिक्षक मॉन्टी देसाईंचा राजीनामा

नवी दिल्ली : कॅनडाच्या पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मॉन्टी देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. १

Joe Root Test Stats : १३ धावा अन् महाविक्रम! जो रूट करणार सचिन तेंडुलकरची बरोबरी ?

पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) सुरू असलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट (Joe Root) एका ऐतिहासिक टप्प्यावर