Friday, July 31, 2026

CRIME : डोंबिवली हादरली! कामाची आणि निवाऱ्याची सोय करण्याचे आमिष दाखवून १६ वर्षीय हतबल मुलीवर सामूहिक अत्याचार; मुख्य आरोपीसह तिघे अटकेत

CRIME : डोंबिवली हादरली! कामाची आणि निवाऱ्याची सोय करण्याचे आमिष दाखवून १६ वर्षीय हतबल मुलीवर सामूहिक अत्याचार; मुख्य आरोपीसह तिघे अटकेत

डोंबिवली: महाराष्ट्राच्या डोंबिवली शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादानंतर घरातून निघून गेलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या हतबलतेचा गैरफायदा घेत तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कामय घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीसह त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. या अमानुष प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेमकी घटना काय?

काही दिवसांपूर्वी कौटुंबिक वादानंतर ही १६ वर्षीय मुलगी घरातून निघून गेली होती. राहण्यासाठी आसरा आणि खाण्यापिण्याची सोय नसल्यामुळे ती अत्यंत हवालदिल आणि हतबल झाली होती. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ती बेपत्ता झाल्याने तिच्या नातेवाईकांनी अपहरणाची तक्रार दाखल केली होती. यादरम्यान, बदलापूर-कटाई रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये ती जेवणासाठी गेली असता, तिच्याकडे पैसे नसल्याचे हॉटेल चालक अंगूर ठाकूर याने पाहिले. त्याने तिला जेवायला देऊन मदतीचे नाटक केले आणि तिचा विश्वास संपादन केला.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

त्यानंतर त्याने परिसरातील दोन अल्पवयीन तरुणांशी तिची ओळख करून दिली. पीडित मुलीने आपली बिकट परिस्थिती सांगितल्यानंतर, या तिघांनी तिला काम शोधून देण्याचे आणि राहण्याची व्यवस्था करण्याचे झूठे आश्वासन दिले.

ज्यांच्यावर ठेवला विश्वास, तेच निघाले नराधम

काम आणि निवारा मिळण्याच्या आशेने ती अल्पवयीन मुलगी पूर्ण विश्वासाने त्यांच्यासोबत गेली. मात्र, या नराधमांनी तिला एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर अमानुषपणे सामूहिक अत्याचार केला. या कृत्यानंतर आरोपींनी तिला रस्त्यावर सोडून दिले आणि तिथून पळ काढला. अत्यंत हलाकीच्या आणि वाईट परिस्थितीत ही मुलगी कुळगाव बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोहोचली, जिथे सतर्क नागरिकांनी तिला पाहून तात्काळ पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलिसांची धडक कारवाई

कुळगाव बदलापूर पोलिसांनी मुलीची विचारपूस केली असता तिने आपबिती सांगितली. मानपाडा पोलीस ठाण्यात आधीच अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याने कुळगाव बदलापूर पोलिसांनी तत्काळ मानपाडा पोलिसांना याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

मुख्य आरोपी अंगूर ठाकूर (वय २२, हॉटेल चालक) याला पोलिसांनी रीतसर अटक केली असून त्याला कल्याण न्यायालयात हजर केले जाणार आहे. तसेच, इतर दोन अल्पवयीन आरोपींची रवानगी बाल न्यायालयात करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >