महाराष्ट्रात गाजलेल्या 'सैराट' चित्रपटातील 'सल्या' म्हणजे अरबाज शेख याच्या वडिलांचे निधन झाले आहे. या मुळे अरबाज आणि त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
अरबाज चे वडील अस्लम शेख यांना ब्रेन हॅमरेज झालं होतं. गेल्या महिन्याभरापासून त्यांना सोलापूरमधील खासगी रुग्णालयात (Private Hospital) दाखल करून उपचार सुरु होते. परंतु दुर्दैवाने त्यांची प्राणज्योत मावळली. गेल्या काही दिवसापूर्वी अरबाजने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यामध्ये अत्यंत दु:खी अवस्थेत तो म्हणाला होता मला माझ्या वडीलांना मरताना पहायचे नाही.
Shalarth ID Scam : राज्यातील बहुचर्चित राज्य शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची फसवणूक झालेल्या 'शालार्थ आयडी' घोटाळ्याच्या (Shalarth ID Scam) तपासाला आता अधिक वेग आला आहे. या ...
वडिलांच्या निधनानंतर अरबाजने आता पहिली पोस्ट शेअर करत त्याचे दु:ख व्यक्त केले आहे. वडिलांना वाचवण्यासाठी अरबाजनं खूप धावपळ केली होती, खूप मेहनत घेतली होती मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अरबाजने ज्या रुग्णालयात त्याच्या वडिलांना दाखल केलं होतं, तिथं औषधांच्या नावाने लूट होत असल्याचं एका व्हिडीओ मधून निदर्शनास आणून दिलं होतं. ज्याची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अन्न आणि औषध प्रशासनानेही (Food and Drug Administration) घेतली होती.
ॲपल आपली फ्लॅगशिप स्मार्टफोन लाइन नवीन रूपात सादर करण्यासाठी सज्ज होत असून, आगामी 'आयफोन १८' सिरिजबाबत तंत्रज्ञान विश्वात मोठी उत्सुकता पाहायला मिळत ...
पण अरबाजने तो व्हिडीओ शेअर केल्याच्या काही तासांनी डिलीट केला. त्यानंतर आणखी एक पोस्ट करत व्हिडीओ डिलीट करण्याचं कारणही सांगितलं होतं. आपल्यासाठी आपले वडील आणि कुटुंब प्राथमिकता (Priority) असल्याचं त्याने सांगितलं होतं.
वडिलांच्या निधनानंतर अरबाजने त्यांचा शेवटचा फोटो शेअर केला आहे, ज्यात हॉस्पिटल मध्ये असताना वडिलांनी त्याचा हात घट्ट धरला होता.






