मुंबई : गुरुपौर्णिमेनिमित्त ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी आपल्या अभिनय प्रवासातील गुरूंच्या आठवणींना उजाळा दिला. अभिनय शिकवणारे केवळ दिग्दर्शक किंवा शिक्षकच नव्हते, तर सहकलाकारांनीच मला घडवलं, प्रोत्साहन दिलं अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील प्रवासात लक्ष्मीकांत बेर्डे(Laxmikant Berde), विजय कदम, विजय चव्हाण, राजा गोसावी, शरद तळवलकर आणि सुधीर जोशी यांसारख्या दिग्गज कलाकारांकडून अभिनयाचे अनेक बारकावे शिकायला मिळाले, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या प्रत्येक भूमिकेतून आणि काम करण्याच्या शैलीतून अभिनयातील शिस्त, संवादफेक आणि प्रेक्षकांशी नाळ जोडण्याची कला आत्मसात करता आली, असे दामले म्हणाले.(Prashant Damale)
मुंबई: रणबीर कपूर आणि यश यांच्या बहुप्रतीक्षित 'रामायण' या महाकाय चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली ...
यावेळी त्यांनी अशोक सराफ यांच्यासोबतचा एक खास प्रसंगही सांगितला. अभिनयाच्या सुरुवातीच्या काळात सराफ यांनी कोणतीही भूमिका स्वतःच्या विचाराने समजून साकारावी, असा महत्त्वाचा सल्ला दिला होता. नंतर 'सवत माझी लाडकी' चित्रपटातील त्यांच्या अभिनयाला पुरस्कार मिळेल, असा विश्वासही सराफ(Ashok Saraph) यांनी व्यक्त केला होता आणि तो खरा ठरल्याचे दामले यांनी नमूद केले. त्या प्रोत्साहनामुळे अभिनयाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलल्याचे त्यांनी सांगितले.(Prashant Damale)
प्रशांत दामले यांनी शालेय जीवनातील शिक्षकांचेही विशेष स्मरण केले. राजा शिवाजी विद्यालयातील शिक्षकांनी केवळ अभ्यासच नव्हे, तर शिस्त, व्यक्तिमत्त्व आणि स्वयंशिस्तीचे धडे दिले. याच संस्कारांमुळे अभिनय क्षेत्रात आवश्यक असलेली शिस्त अंगी बाणली, असे त्यांनी सांगितले.त्याचबरोबर सतीश तारे, वंदना गुप्ते(Vandana Gupte) आणि कविता लाड यांच्यासारख्या सहकलाकारांकडूनही प्रत्येक प्रयोगात काही ना काही शिकायला मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. "आज मी जे काही आहे, त्यात माझ्या सहकलाकारांचा आणि शिक्षकांचा मोठा वाटा आहे. तेच माझे खरे गुरू आहेत," अशा शब्दांत त्यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त केली.(Prashant Damale)





