नाशिक : नाशिक महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात आल्यानंतर तब्बल चार वर्षानंतर गंगापूर धरणातील जलपूजनाचा मान महापौरांना मिळ्णार आहे. महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या शुभहस्ते मंगळवार २८ जुलै रोजी सकाळी आठ वाजता केले जाणार आहे. यावेळी उपमहापौर विलास शिंदे, स्थायी सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री व सर्व गटनेते, नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.(Nashik)
मुंबई : राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागांतर्गत ...
एल निनोचा(El Niño) प्रभाव जून महिन्यात प्रकर्षाने दिसून आल्याने संपूर्ण महिनाभर पावसाने पाठ फिरवली होती. परिणामी नाशिक शहराला ३१ ऑगस्ट पर्यत पाणी पुरवठयाचे नियोजन करावयाचे असल्याने प्रशासनाने जून व जूलै मध्ये दर शनिवारी पाणी कपातीचा निर्णय घेतला. तर परिस्थिती अशीच राहील्यास ऑगस्टमध्ये दोन दिवसाआड पाणी कपात केली जाणार होता. मात्र पावसाने जून मधील कसर जुलै महिन्यात भरुन काढत गोदावरीला सलग दोन मोठे पूर आले. गेल्या बुधवारपासून शहर व गंगापूर धरण क्षेत्रात पाऊस बरसत असल्याने धरणातून आजही चार हजारहून अधिक क्युसेकने विसर्ग केला जातो आहे. गंगापूर धरणातील पाणीसाठा नव्वद टक्यावर गेल्याने प्रशासनाने शहरातील पाणी कपातीचा निर्णय मागे घेतला आहे. नाशिक शहराला गंगापूर धरण व काही प्रमाणात मुकणे आणि दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गंगापूर धरण भरल्यावर दरवष धरणक्षेत्रावर जाऊन महापौरांच्या हस्ते जलपूजन केले जाते.
नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील देशातील एक अग्रेसर आणि महत्त्वाची बँक असलेल्या 'बँक ऑफ बडोदा'चा (Bank of Baroda)तब्बल १ टीबी इतका प्रचंड आणि संवेदनशील डेटा ...
प्रथम महापौर दिवंगत शांताराम बापू वावरे यांच्यापासून जलपूजनाची परंपरा सुरु झाली आहे. वेळेत निवडणुका न झाल्याने महापालिकेत १३ मार्च २०२२ पासून प्रशासकीय राजवट लागू होऊन चार वर्ष प्रशासकीय राजवट होती. मात्र आता चार वर्षानंतर महापौरांच्या हस्ते जलपूजन होणार असल्याने पुन्हा जलपूजनाची परंपरा सुरु होत आहे.






