Monday, July 27, 2026

Ambernath Crime : अंबरनाथमध्ये संतापजनक प्रकार; 12 व्या मजल्यावरून मांजरीला ढकलून हत्या, CCTV फुटेज व्हायरल

Ambernath Crime : अंबरनाथमध्ये संतापजनक प्रकार; 12 व्या मजल्यावरून मांजरीला ढकलून हत्या, CCTV फुटेज व्हायरल

अंबरनाथ : अंबरनाथ पूर्वेतील पालेगाव परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. रॉयल फ्लोरा या इमारतीच्या ए विंगमध्ये एका व्यक्तीने १२ व्या मजल्यावरून फिरत असलेल्या मांजरीला मुद्दाम खाली ढकलल्याचा प्रकार उघड झाला आहे. ही संपूर्ण घटना इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

रविवारी (२६ जुलै) सायंकाळी सुमारे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. व्हिडिओमध्ये एक वयस्कर व्यक्ती दबक्या पावलांनी डक्टजवळ येताना दिसतो. त्यानंतर तो मांजरीला खाली ढकलतो आणि ती खाली पडल्याची खात्री करण्यासाठी वाकून पाहतो. त्यानंतर तो तेथून शांतपणे निघून जातो. या घटनेत मांजरीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या अमानुष कृत्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून संबंधित व्यक्तीविरोधात प्राण्यांवरील क्रूरतेच्या आरोपाखाली कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक आणि प्राणीप्रेमींकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी आता प्राणी संरक्षण कायद्यानुसार या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे .मात्र या व्यक्तीने मांजरीला का ढकललं? मांजरीला १२ व्या मजल्यावरून ढकलण्यामागचं कारण नेमक काय? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >