भाजपला मोठी संधी...

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी संधी घेतली आहे. मोदी या निमित्ताने मंत्रिमंडळात मोठा फेरबदल घडवून आणतील आणि जो नरेटिव्ह विरोधी पक्षांनी सेट केला होता तो हाणून पाडला जाईल. पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर शिक्षेची तरतूद करून मोदींनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबतही दक्षता घेतली आहे.


केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि कॉकरोच पार्टीमध्ये जल्लोष उसळला आहे. अभिजीत दीपके यांनी उन्मादावस्थेत वक्तव्य केले, की हा आमचा विजय आहे आणि मोदी यांची पहिली हार आहे. कारण राजनाथ सिंग यांनी असे वक्तव्य पूर्वी केले होते, की भाजप सरकारमध्ये मंत्र्यांचे राजीनामे होत नाहीत. पण ते खोटे ठरले. त्यामुळे कॉकरोच पार्टीच्या लोकांनी जल्लोष केला. पण मोदी यांनी ही मोठी संधी घेतली आहे. कारण या आंदोलनाच्या निमित्ताने मोदी यांनी पेपरफुटीसंबंधी अत्यंत कडक धोरण राबवले आहे आणि आता पेपरफुटी प्रकरणात दोषी असलेल्यांवर कठोर शिक्षेची तरतूद केली आहे. आता मोदी या निमित्ताने मंत्रिमंडळात मोठा फेरबदल घडवून आणतील आणि जो नरेटिव्ह विरोधी पक्षांनी सेट केला होता तो हाणून पाडला जाईल. मोदी यांनी राजकीय चळवळींमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ नये म्हणून ही दक्षता घेतली आहे.




१९५६ मध्ये पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तो एक त्यांनी ट्रेंड सेट केला होता. त्याचीच पुनरावृत्ती भाजपने केली आहे. माधवराव शिंदे यांनी तोच नमुना गिरवला होता आणि त्यांनीही १९९३ मध्ये नागरी उड्डाण मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्याच परंपरेला साजेसा प्रधान यांचा राजीनामा आहे. रस्त्यावरच्या आंदोलनामुळे एखाद्या केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागतो हा नरेटिव्ह सेट होऊ नये असे वाटते. कारण या आंदोलनामागे सोनम वांगचूक यांचा चेहरा असला तरीही खरे कर्तेकरविते अरविंद केजरीवाल हेच होते. प्रधान यांनी ओडिशा राज्यात १९७७ मध्ये विद्यार्थ्यांच्या व्यापक आंदोलनाचे नेतृत्व केले होते आणि तेव्हा ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नेते होते. त्यांनी ओडिशा सचिवालयासमोर निदर्शने केली होती. त्याच प्रधानांना विद्यार्थ्यांच्या चळवळीसमोर हतबल होऊन आपला राजीनामा सादर करावा लागला आहे.




पंतप्रधान मोदी पुन्हा या संधीचा उपयोग करून घेऊन आपली प्रशासकीय इमेज पुनर्स्थापित करू शकतात. ते आता केंद्रीय मंत्रिमंडळाची पुनर्रचना करू शकतात आणि त्यात आपल्याला हवे ते लोक घेऊ शकतात. प्रमुख कृतींतून मोदी आता फेररचना करून पुन्हा आपली छबी मजबूत करू शकतात. गेले काही दिवस ती विविध कारणांनी कमजोर झाली होती. यात मोदी यांचे दोन हेतू सफल होतील. एक म्हणजे नवे शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांना नेमून विद्यार्थ्याना शांत केले जाईल. अभिजीत दीपके यांनी उन्मादी अवस्थेत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की ही पहिली विकेट आहे. पण दुसरी विकेट जाऊ देण्याइतपत मोदी निश्चितच यापुढे सावध राहतील. आणि दीपके यांची उन्मादी अवस्था हे दाखवून देते की ते परिपक्व नेते नाहीत. प्रत्येक मुद्याचे रूपांतर मोदीविरोधी आंदोलनात करणे हा विरोधकांचा अजेंडा दिसला आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन मोदी यांनी अनेक तीर मारले आहेत. त्यांनी मुख्यतः विद्यार्थ्यांचे आंदोलनाचे शस्त्र बोथट केले आहे. आणि मुख्य लाभ असा झाला आहे, की परीक्षांमधील गैरप्रकारांबाबत जो मोदी आणि वरिष्ठ नेतृत्वावर दोष आला असता तो ही टळला आहे. दुसरा मोठा लाभ मोदी यांचा असा झाला आहे, की त्यांची प्रशासनावर पकड ढिली झाल्याची काही दिवसांपासून समजूत पसरली होती. ती आता दूर होऊन त्यांची मजबूत पकड प्रशासनावर निर्माण होण्यास यामुळे सहाय्य होणार आहे.




नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका या देशात जन झेड यांनी केलेल्या आंदोलनामुळे तख्ता पलट झाला. पण तसे काही होईल असे काँग्रेसला आणि समाजवादी पार्टीला वाटत होते. त्यामुळे राहुल आणि अखिलेश त्या उत्साहात होते की भारतातही असेच काही होईल आणि पुन्हा आपल्याकडे सत्ता येईल. पण मोदी यांनी ती वात तेथेच दाबून टाकली आहे आणि त्यामुळे खरी निराशा तर राहुल आणि अखिलेश यांची झाली असेल. अशीच निराशा विरोधकांची यापूर्वीही फार्म लॉजच्या वेळेस झाली होती. तेव्हाही काँग्रेस असे समजून चालली होती की शेतकऱ्यांच्या आंदोलनात आता शेतकरी संतप्त होऊन भाजपचे सरकार उलथून टाकतील. पण मोदी यांनी आपले तीन कायदे परत घेऊन विरोधकांना खास करून काँग्रेसला पार निराश करून टाकले. आताही तसेच




झाले आहे. आणि आणखी एक विशेष बाब मोदी यांनी प्रधान यांच्या राजीनाम्याने साध्य केली आहे, ती म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस आणि सपा पार्टी या शस्त्राचा वापर करणार होते. ते स्वप्नच उरणार आहे. कारण जरी विद्यार्थ्यांना या निवडणुकीत आंदोलन करण्यासाठी उतरवले तरीही त्याचा उपयोग होणार नाही. जनप्रक्षोभ जो सरकारविरोधात होता, त्याचे रुपांतर मोदी यांनी एका निर्णयाने एका व्यक्तीविरोधात करून त्यांचा राजीनामा घेऊन एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत विद्यार्थी का इतके आग्रही होते, त्याचे कारण हे आहे की प्रधान यांनी शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यास सुरूवात केली होती. त्यांनी मुघलकालीन इतिहास बदलण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे काँग्रेसी आणि तमाम लिब्रांडूंमध्ये संताप व्यक्त होत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा उपयोग करून प्रधान यांना हटवणे त्यांच्यासाठी आवश्यक बनले होते. त्यामुळे प्रधान यांना हटवण्यासाठी अनेक नेते विशेषतः काँग्रेस पक्ष विशेषच आग्रही होता.



मोदी यांच्या राजवटीत एकाही मंत्र्याने राजीनामा दिला नव्हता किंवा कुणाला राजीनामा देण्यास सांगण्यात आलेही नव्हते. पण प्रधान यांचा अपवाद करण्यात आला. कारण विद्यार्थ्यांमध्ये वाढता असंतोष पेटला असता तर देश संकटात सापडला असता. राजकीय कारणांमुळे आणि तरुणांची मते मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला, तरी राहुल गांधी यांची यामुळे निराशा झाली आहे.

Comments
Add Comment

आता तरी बेस्टचे अपघात टळतील?

मुंबईकरांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा वाहतूक पर्याय म्हणजे बेस्ट बस सेवा. दररोज लाखो प्रवाशांना

कोकणचं कॅलिफोर्निया अन् बारामती...!

राजकीय विरोध करणं वेगळं आणि विकासाच्या आडवं जात सातत्याने विकासप्रक्रियेला विरोध करणं वेगळी गोष्ट आहे. आपल्या

सत्ताबदलाची आशा, की नव्या निराशा?

नेपाळमध्ये सध्याचे आंदोलन हे एका सरकारच्या विरोधापुरते मर्यादित नाही, तर लोकांच्या अपेक्षा आणि शासनाच्या

देवाभाऊंचा जनोत्सव

राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री अशा मान्यवरांचे वाढदिवस सर्वत्र नेहमीच उत्साहात साजरे केले जातात. त्यातच ते

मुत्सद्दी चाल

दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलन, सोनम वांगचुक यांचे उपोषण आणि केंद्र सरकारची राजकीय मुत्सद्देगिरी यामुळे

मराठवाड्यात रेल्वे क्रांतीची नांदी

मराठवाड्याच्या रेल्वे विकासाला आता नवी गती मिळणार आहे. धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाकांक्षी २४०