Water storage : खरीप हंगामावर वरुणराजाची कृपादृष्टी, नाशिकसह इतर विभागांतील पाणीसाठा किती ? 

Nashik : जून महिना कोरडा गेल्यानंतरही झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरली आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह पुढील वर्षभराच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून, विहिरी व बोअरवेलमध्येही मुबलक पाणी उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. परिणामी खरिप हंगाम बहरण्याची शक्यता असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.


नाशिक जिल्ह्यातील २२ धरणांमध्ये सध्या ४२४८.९२ दलघमी जलसाठा असून त्याची टक्केवारी ७१.९४ अशी आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी, शेती तसेच उद्योगांसाठी पुरेसा साठा उपलब्ध झाला आहे. मागील वर्षी चांगला पाऊस होऊनही काही भागात पाणीटंचाई निर्माण झाली होती आणि टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. मात्र यंदा टँकरची गरज कमी होण्याची शक्यता आहे. नाशिक शहराची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरण समूहात ८८.२० टक्के, तर गंगापूर धरणात ८४.५१ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. या साठ्यामुळे पुढील वर्षभर नाशिक शहराचा पाणीप्रश्न सुटणार आहे. जिल्ह्यात निफाड, दिंडोरी व नाशिक तालुक्यात द्राक्ष शेती, तर चांदवड, कळवण, येवला व सिन्नरमध्ये कांदा आणि मका तसेच बागलाणमध्ये कांदा व डाळिंबाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. यंदाच्या समाधानकारक पावसामुळे शेतीला मोठा आधार मिळणार आहे.



राज्यातील इतर विभागांतील धरणसाठा किती ? 



मोठे प्रकल्प (Major Projects) 


 











































































अ. क्र. प्रदेश (Region) धरणांची संख्या (Dams) प्रकल्पीय पाणीसाठा (एकुण) आजचा पाणीसाठा (एकुण) आजचा उपयुक्त साठा (%) गत वर्षांतील साठा (%)
नागपूर १६ ४३०२.४२ २६८३.६५ ५४.६३% ५३.७५%
अमरावती १० २९५३.८८ १६०५.९० ५५.५४% ४३.८६%
छत्रपती संभाजीनगर ४४ ५९३८.९२ ३०००.७६ ६६.५९% ३५.१८%
नाशिक २२ ४२४८.९२ ३२०२.१९ ७२.३८% ७१.९४%
पुणे ३५ १५३९४.७५ १२९५७.०८ ८४.२४% ८०.४१%
कोकण ११ २६९३.२१ २२५६.४२ ८८.९२% ८२.६८%
- एकूण मोठे प्रकल्प १३८ ३५५३२.११ २५७०५.९९ ७४.४९% ६६.३३%

मध्यम प्रकल्प (Medium Projects)














































































अ. क्र. प्रदेश (Region) धरणांची संख्या (Dams) प्रकल्पीय पाणीसाठा (एकुण) आजचा पाणीसाठा (एकुण) गत वर्षांतील साठा (%) आजचा उपयुक्त साठा (%)
नागपूर ४३ ७७१.२९ ३१०.३५ ३४.२८% ६२.७०%
अमरावती २७ ८७६.२२ ४२९.५७ ४२.२०% ५५.७२%
छत्रपती संभाजीनगर ८१ १२२५.६३ ३४१.३३ १७.६५% ३३.४४%
नाशिक ५५ १४३२.६३ ९०६.५१ ५६.००% ५५.६०%
पुणे ५० १४५९.९२ ९७०.७९ ६४.०६% ८२.४४%
कोकण ५९०.५४ ४६३.९४ ७७.९०% ६७.७०%
- एकूण मध्यम प्रकल्प २६४ ६३५६.२२ ३४२२.४९ ४८.५१% ६०.०५%


लघु प्रकल्प (Minor Projects) 














































































अ. क्र. प्रदेश (Region) धरणांची संख्या (Dams) प्रकल्पीय पाणीसाठा (एकुण) आजचा पाणीसाठा (एकुण) गत वर्षांतील साठा (%) आजचा उपयुक्त साठा (%)
नागपूर ३२८ ५८१.८२ २३९.५७ ३४.५८% ४८.८७%
अमरावती २३९ ८८७.३३ ५२८.६७ ४१.६५% ४१.७९%
छत्रपती संभाजीनगर ८०४ १९६१.७३ ४७०.३७ १३.८६% २३.४५%
नाशिक ४६२ ११३९.४३ ४०२.९९ ३३.४९% ३६.३४%
पुणे ६३९ १५४०.११ ४६७.१० २७.५१% ४३.८९%
कोकण १५५ ५८८.२९ ४४५.४० ७३.५५% ७६.४३%
- एकूण लघु प्रकल्प २६२७ ६६९८.७० २५५४.१० ३१.३३% ३९.९५%

महाराष्ट्र राज्य (सर्व धरण) प्रकल्प (Maharashtra State - All Dam Projects) 


 











































































अ. क्र. प्रदेश (Region) धरणांची संख्या (Dams) प्रकल्पीय पाणीसाठा (एकुण) आजचा पाणीसाठा (एकुण) गत वर्षांतील साठा (%) आजचा उपयुक्त साठा (%)
नागपूर ३८७ ५६५५.५२ ३२३३.५७ ५५.१९% ४८.७६%
अमरावती २७६ ४७१७.४३ २५६४.१४ ५२.७७% ४३.०९%
छत्रपती संभाजीनगर ९२९ ९१२६.२८ ३८१२.४५ ५१.५४% २७.५८%
नाशिक ५३९ ६८२०.९९ ४५११.६९ ६२.८४% ६२.१६%
पुणे ७२४ १८३९४.७७ १४३९४.९७ ८०.२५% ७३.९३%
कोकण १७४ ३८७२.०४ ३१६५.७६ ८३.६६% ८०.५३%
- एकूण महाराष्ट्र राज्य (सर्व धरण) प्रकल्प ३०२९ ४८५८७.०२ ३१६८२.५८ ६७.३४% ५८.६४%
Comments
Add Comment

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता