Bihar Student Protest : बिहार बंद आंदोलनादरम्यान गोळीबार, AK-47 वापरल्याप्रकरणी पोलीस निलंबित, व्हिडिओ व्हायरल

बिहारमध्ये पेपरफुटी प्रकरणासह (Bihar) विविध मागण्यांसाठी विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या 'बिहार बंद' (Bihar Band) आंदोलनादरम्यान सिवान जिल्ह्यात हिंसक घटना घडल्याचे समोर आले आहे. आंदोलनादरम्यान एका पोलिसाने AK-47 रायफलमधून गोळीबार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित पोलिसाला निलंबित करण्यात आले असून विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, 25 जुलै रोजी सिवान येथील गांधी मैदान परिसरात विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान परिस्थिती तणावपूर्ण बनली आणि जेपी चौक परिसरात आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये संघर्ष झाला. यावेळी जमावाकडून दगडफेक करण्यात आल्याचे सांगितले जात असून, त्यात सिवानचे पोलीस अधीक्षक पी. झा जखमी झाले. त्यांच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती आहे. (Student Protest)



त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. याच दरम्यान विशेष तपास पथकात (SIT) कार्यरत आणि पोलीस अधीक्षकांच्या सुरक्षेसाठी नियुक्त असलेला जवान अभिषेक कुमार पटेल याने AK-47 रायफलमधून गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली. (Paper Leak)


प्राथमिक चौकशीनंतर बिहार पोलीस मुख्यालयाने संबंधित जवानाला तात्काळ निलंबित केले आहे. तसेच त्याच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून गोळीबार कोणत्या परिस्थितीत करण्यात आला, तो पोलीस नियमांनुसार होता का आणि त्याची आवश्यकता होती का, याचा तपास वरिष्ठ अधिकारी करत आहेत. (Bihar Police AK 47)



या घटनेत 3 विद्यार्थी जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यांच्या दुखापतींचे नेमके स्वरूप आणि गोळ्या नेमक्या कशामुळे लागल्या, याबाबत अधिकृत तपास सुरू आहे.


दरम्यान, या घटनेनंतर बिहारमधील राजकीय वातावरण तापले असून विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. पोलिसांच्या कारवाईबाबत विविध स्तरांवर प्रश्न उपस्थित केले जात असून तपासाच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









Comments
Add Comment

FDA Raid On KFC and Dominos : KFCमध्ये सडलेलं चिकन, Domino’sवरही कारवाई; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना FDA चा दणका

FDA Raid On KFC and Dominos : महागड्या दरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या मोठ्या फूड ब्रँड्सच्या अन्नगुणवत्तेवर पुन्हा एकदा

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र